NIA चे हैदराबाद, वर्धा येथे छापे; वर्ध्याहून महिलेला घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 01:37 PM2019-04-20T13:37:34+5:302019-04-20T13:40:40+5:30
महत्वाचे म्हणजे वर्धा येथील मसाळा परिसरातून तपास यंत्रणांनी एका महिलेला ताब्यात घेतले आहे.
नवी दिल्ली - ISIS शी संबंध असल्याच्या संशयावरून हैदराबादमध्ये तीन तर वर्धा येथील एका ठिकाणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाने आज सकाळी छापे टाकले. महत्वाचे म्हणजे वर्धा येथील मसाळा परिसरातून तपास यंत्रणांनी एका महिलेला ताब्यात घेतले आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. एनआयएच्या पथकाने शनिवारी सकाळी हैदराबादमध्ये तीन ठिकाणी तर वर्धा येथे मसाळा परिसरात छापा टाकला. ISIS शी संबंध असल्याच्या संशयातून एनआयएने ही कारवाई केल्या समोर येत आहे. या तपास यंत्रणेच्या पथकाने या चार ठिकाणी छापे टाकून झाडाझडती घेतली असून या कारवाईबाबत एनआयएने अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही. मात्र वर्ध्याहून महिलेला का ताब्यात घेण्यात आले. छापा टाकला तेव्हा तिच्याकडे असं नेमकं काय सापडलं की तिला ताब्यात घेण्यात आलं. याबाबत माहिती मिळालेली नाही.
NIA Sources: NIA is carrying out searches at 3 locations in Hyderabad and one in Wardha, against ISIS module. pic.twitter.com/rxaeJJAlT8
— ANI (@ANI) April 20, 2019
Telangana: NIA (National Investigation Agency) is carrying out searches at three locations in Hyderabad, against ISIS module. pic.twitter.com/JGXLZyCyJg
— ANI (@ANI) April 20, 2019