अकोल्यात गुटखा माफीयावर छापे; तीन लाखांचा गुटखा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 12:12 PM2018-08-25T12:12:19+5:302018-08-25T12:14:20+5:30

अकोला - राज्यात प्रतिबंधीत असलेल्या गुटख्याचा मोठया प्रमाणात साठा करून विक्री करणाऱ्या घनशाम अग्रवाल व चमन अग्रवाल या दोघांच्या दुकानांवर व निवासस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमूख हर्षराज अळसपुरे यांनी शुक्रवारी मध्यरात्री छापेमारी केली.

Raids onGutka mafia in Akola; Three lakhs gutkha caught |  अकोल्यात गुटखा माफीयावर छापे; तीन लाखांचा गुटखा पकडला

 अकोल्यात गुटखा माफीयावर छापे; तीन लाखांचा गुटखा पकडला

googlenewsNext
ठळक मुद्देदोन्ही माफीयांच्या निवासस्थानी गुटख्याचा मोठया प्रमाणात साठा असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमूख हर्षराज अळसपुरे यांना मिळाली. या छापेमारीत दुकान व निवासस्थानावरून तीन लाख रुपयांचा गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे.

अकोला - राज्यात प्रतिबंधीत असलेल्या गुटख्याचा मोठया प्रमाणात साठा करून विक्री करणाऱ्या घनशाम अग्रवाल व चमन अग्रवाल या दोघांच्या दुकानांवर व निवासस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमूख हर्षराज अळसपुरे यांनी शुक्रवारी मध्यरात्री छापेमारी केली. या दोन ठिकाणांवरून तब्बल ३ लाख रुपयांचा गुटखा साठा जप्त करण्यात आल आहे.
खोलेश्वर परिसरातील रहिवासी तथा बडा गुटखा माफीया म्हणूण ओळख असलेल्या घनशाम अग्रवाल व चमन अग्रवाल या दोन्ही माफीयांच्या निवासस्थानी गुटख्याचा मोठया प्रमाणात साठा असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमूख हर्षराज अळसपुरे यांना मिळाली. त्यांच्या पथकाने मध्यरात्रीच पाळत ठेउन दोन्ही ठिकाणांवर एकाचवेळी छापेमारी केली. या छापेमारीत दुकान व निवासस्थानावरून तीन लाख रुपयांचा गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे. घनशाम अग्रवाल व चमन अग्रवाल या दोघांवर वाहतुक शाखेचे प्रमूख विलास पाटील यांनीही गत एका महिन्यात तीनदा कारवाई करुन गुटख्याचा साठा जप्त केला होता, त्यानंतरही मोठया प्रमाणात गुटख्याची चोरटया मार्गाने वाहतुक व विक्री करण्यासाठी या दोघांचा पुढाकार असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

एफडीएचे अधिकारी खाली हात
अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त लोभसिंह राठोड यांच्यासह अन्न निरीक्षकांनी शुक्रवारी सकाळीच जुना भाजी बाजारातील अंबीका व अन्य काही प्रतिष्ठांनावर तपासणी केली. मात्र हे अधिकारी येताच गुटखा माफीयांनी त्यांच्या दुकानांना कुलुपबंद करून पळाले, या दुकानांमध्ये गुटखा असतांनाही त्यांनी कारवाई केली नसल्याचे वास्तव आहे. यावरुन गुटखा माफीया अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाºयांवर शिरजोर झाल्याचे दिसून येत आहे. एफडीएचे अधिकारी खाली हात परतल्यानंतर काही तासाच्यानंतर विशेष पथकाचे प्रमूख हर्षराज अळसपुरे यांनी छापेमारी करीत तब्बल ३ लाखांचा गुटखा साठा जप्त केला. यावरुन गुटखा माफीया व एफडीएच्या अधिकाºयांची मिलीभगत उघड झाली आहे.

अग्रवालवर वारंवार कारवाई
घनशाम अग्रवाल व चमन अग्रवाल या दोन्ही गुटखा माफीयांवर पोलिसांनी वारंवार कारवाई केली आहे. मुंबई येथील पथक अकोल्यात दाखल होउन त्यांनीही यांच्यावर कारवाई केली, मात्र त्यानंतरही या दोन्ही गुटखा माफीयांचा हा गोरखधंदा जोरात सुरु असल्याने त्यांच्यावर मकोकासारखी कठोर कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.

 

Web Title: Raids onGutka mafia in Akola; Three lakhs gutkha caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.