अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या विकृताची माहिती देणाऱ्यास 25 हजारांचे बक्षीस

By पूनम अपराज | Published: September 22, 2018 01:11 AM2018-09-22T01:11:25+5:302018-09-22T01:12:38+5:30

नालासोपाऱ्यात चार दिवसात दोन मुलींवर अत्याचार, पोलिसांची जोरदार शोधमोहीम

A reward of 25 thousand for those who give information about the sexual harassment of minor girls, a reward of 25 thousand rupees | अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या विकृताची माहिती देणाऱ्यास 25 हजारांचे बक्षीस

अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या विकृताची माहिती देणाऱ्यास 25 हजारांचे बक्षीस

Next

वसई - मुंबई आणि ठाण्यात अल्पवयीन मुलींवर बलात्कार कऱणारा विकृत नालासोपाऱ्यात दाखल झाला आहे. चार दिवसात त्याने दोन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केले आहे. त्याच्या माग काढण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, गुन्हे प्रकटीकरण शाखेसह पोलिसांनी अनेक पथके बनवली आहेत. पालक आणि मुलींना पोलिसांनी सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. पोलिसांनी शाळांमध्ये मिटिंग घेऊन विद्यार्थिनी आणि शिक्षकांना सावधगिरी बाळगण्याचा सूचना दिल्या आहेत. 
मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथे गेल्या काही दिवसांपासून एका विकृत तरूण अल्पवयीन मुलींना फूस लावून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत आहे. अल्पवयीन मुलींना गाठून 'तुझ्या वडिलांनी बोलावले आहे', 'तुझ्या वडिलांनी पत्र दिले आहे' अशा सबबी सांगून निर्जन ठिकाणी घेऊन जायचा. तिथे तुझ्या अंगावर किडा पडला आहे, असे सांगत कपडे काढायला सांगायचा आणि मग त्या मुलीवर बलात्कार करायचा. आता हा विकृत नालासोपारा शहरात दाखल झाला आहे. चार दिवसात या विकृताने दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केले आहे. 
मंगळवारी त्याने नालासोपारा पुर्वेच्या संखेश्वर नगर मध्ये १३ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला होता. त्यानंतर त्याने गुरूवारी एव्हरशाईन नगर येथे अशाच पध्दतीने मुलीला फूस लावून नेले. तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. 
 या 'सिरियल रेपिस्ट'ला पकडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. पिडीत मुलींनी दिलेल्या माहितीवरून त्याचे रेखाचित्रे बनविण्यात आली आहेत. मुंबई, ठाणे, आणि नवी मुंबई पोलिसांना जे सीसीटीव्ही चित्रण मिळाले होते, त्यातही हाच विकृत असल्याचे या पिडीत मुलींनी ओळखळे आहे. पोलिसांनी त्याची छायाचित्रे शहरातील विविध ठिकाणी लावली आहेत. पालकांना आणि मुलांना सावधगिरी बालगण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे नालासोपारा शहरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 
 या विकृताचा युध्दपातळीवर शोध सुरू असल्याची माहिती वसईचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी दिली. आम्ही शाळांमध्ये जाऊन शिक्षकांना सावध केले आहे, तर शहरात या विकृताची छायाचित्रे असलेली पत्रके वाटून पालकांना सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत. मुलींनी कुठल्याही अनोळखी व्यक्तींकडे जाऊ नये, त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. नवी मुंबई पोलिसांनी या विकृताची माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षिसही जाहीर केले आहे. हा विकृत ८ ते १३ वर्ष वयोगटातील अल्पवयीन मुलींना लक्ष्य करतो. त्यांना गाठून तुझ्या पालकांनी बोलावले आहे, तुझ्या बाबांनी तुला पत्र दिले आहे, असे सांगून परिसरातील एखाद्या इमारतीच्या गच्चीवर नेऊन जातो. तिथे तुझ्या अंगावर किडा पडला आहे, असे सांगून कपडे काढण्यास भाग पाडून लैंगिक अत्याचार करतो.

Web Title: A reward of 25 thousand for those who give information about the sexual harassment of minor girls, a reward of 25 thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.