धक्कादायक... डोंबिवलीत वृद्ध जोडप्याने एक्स्प्रेसखाली येऊन केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 10:05 PM2018-08-01T22:05:03+5:302018-08-01T22:06:29+5:30

कौटुंबिक त्रासातून विजय पावसकर आणि सविता पावसकर यांनी संपविला जीव 

Shocking ... Dombivli old couple committed suicide under the express | धक्कादायक... डोंबिवलीत वृद्ध जोडप्याने एक्स्प्रेसखाली येऊन केली आत्महत्या

धक्कादायक... डोंबिवलीत वृद्ध जोडप्याने एक्स्प्रेसखाली येऊन केली आत्महत्या

Next

मुंबई - डोंबिवलीरेल्वे स्थानकात अतिशय धक्कादायक दुःखद घटना घडली आहे. एका वृद्ध जोडप्याने कौटुंबिक त्रासाला कंटाळून  आत्महत्या करून आपला जीव संपविला आहे. बिवली येथे एका ज्येष्ठ दाम्पत्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मंगळवारी संध्याकाळी वृद्ध दाम्पत्याने डोंबिवलीरेल्वे स्थानकावर आत्महत्या केली. कौटुंबिक त्रासातून हे पाऊल उचलल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. विजय गणपत पावसकर (वय - ७२) आणि सविता पावसकर (वय - ६९) अशी मृतांची नावे असून ते डोंबिवलीतील अहिरे व्हिलेजचे रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पावसकर या वृद्ध दाम्पत्याने फलाट क्रमांक ५ वर येणाऱ्या  गोरखपूर एक्स्प्रेस येताच त्या समोर उडी मारुन आपले आयुष्य संपवले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे दाम्पत्य बराच वेळ फलाटावर बसून होते. त्यांनी दोनदा ट्रेनसमोर येण्याचा प्रयत्न केला. पण फलाटावरील गर्दीमुळे त्यांना आत्महत्या करता आली नाही. ते बराच वेळ फलाटावरील बाकावर बसून होते.  अखेर गोरखपूर एक्स्प्रेस आल्यावर या दोघांनी स्वत:ला ट्रेनसमोर झोकून दिले. घटनेचा प्रत्यक्षदर्शी सतीश राजे यांनी रेल्वे पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार पावसकर त्यांना फलाटाच्या काठावर चालताना दिसले. मात्र, ते ट्रेनची वाट पाहत असावे, असे त्याला वाटले. पण अचानक ट्रेन येताच त्या दोघांनी उडी मारली आणि काय झाले हे कळालेच नाही, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. ज्येष्ठ दाम्पत्याच्या आत्महत्येमागचे नेमकं कारण कळू शकलेले नाही. पण घरगुती त्रासातून ही आत्महत्या केल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. पण रेल्वे पोलीस या घटनेता अधिक तपास करत आहेत.

Web Title: Shocking ... Dombivli old couple committed suicide under the express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.