कल्याणमधील धक्कादायक घटना; आत्महत्येपूर्वी तरुणाने तयार केला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 02:55 PM2018-12-07T14:55:53+5:302018-12-07T15:28:27+5:30
मृतदेह कल्याण पत्री पूलानजीक रेल्वे मार्गावर मिळून आला. त्याचे शीर धडापासून वेगळं झालेल्या अवस्थेत होते. त्याचा मृतदेह रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन तो सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.
कल्याण - कल्याण पूर्व येथील नेतिवली टेकडी परिसरात राहणाऱ्या रोहित परदेशी या तरुणाने आत्महत्येपूर्वी मोबाईल व्हिडीओ तयार केला आहे. त्यानंतर त्याने रेल्वे रुळाखाली आत्महत्या केली आहे. ही घटना गुरुवार रात्रीची आहे. त्याचा मृतदेह कल्याण पत्री पूलानजीक रेल्वे मार्गावर मिळून आला. त्याचे शीर धडापासून वेगळं झालेल्या अवस्थेत होते. त्याचा मृतदेह रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन तो सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. रोहित हा नेतिवली टेकडी परिसरात राहणारा असल्याची प्राथमिक माहिती आहे.
रोहितने आत्महत्येपूर्वी मोबाईलमध्ये स्वत:चा व्हिडीओ तयार केला आहे. मला माझ्या भावाशिवाय या जगात कोणी नाही. त्यामुळे माझी मालमत्ता माझ्या भावाला द्यावी. माझ्या आत्महत्येविषयी कोणाला जबाबदार धरु नये. मी काढलेला हा व्हीडीओ पोलिसांच्या हाती लागता कामा नये. मी आज रात्र पूर्णपणो जागा राहणार आहे. उद्याचा सूर्य मी पाहणार नाही. माझं नाव रोहित परदेशी असे आहे. हे सगळे त्याने स्वत:च्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले आहे. आज सकाळी रोहितचा मृतदेह रेल्वे मार्गादरम्यान आढळून आला. त्याच्याकडील मोबाईल जप्त केला आहे. त्याच्या मोबाईलमध्ये हा व्हिडीओ मिळून आला आहे.
रोहितने नेमकी कोणत्या कारणावरुन आत्महत्या केली. त्याचा कोणाशी कशाच्या कारणावरुन वाद होता? त्याने व्हिडीओत कोणाला जबाबदार धरलेले नाही. तर मग त्याने आत्महत्या का केली? त्याला असा कोणता मानसिक त्रस होता. त्याला जाणीवपूर्वक हा त्रास दिला जात होता का ? या विविध अंगाने पोलीस तपास करीत आाहे.