धक्कादायक! अमेरिकेतून वांद्रे रेल्वे स्थानक उडवण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 01:30 PM2019-03-12T13:30:07+5:302019-03-12T13:30:45+5:30

स्थानक परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Shocking! Threatens for bomb blast to destroy Bandra station from US | धक्कादायक! अमेरिकेतून वांद्रे रेल्वे स्थानक उडवण्याची धमकी

धक्कादायक! अमेरिकेतून वांद्रे रेल्वे स्थानक उडवण्याची धमकी

Next
ठळक मुद्देपुलवामात झालेल्या दहशतवादी हल्यानंतर देशभरातील सर्वच सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.फोनवरून लवकरच वांद्रे रेल्वे स्थानक स्फोटकांनी उडवून देणार असल्याची धमकी देण्यात आली होती. या घटनेची गांभीर्याने दखल घेत खार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

मुंबई - पश्चिम रेल्वेचे वर्दळीचं स्थानक असलेलं वांद्रे रेल्वे स्थानक बाॅम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचा निनावी फोन रविवारी खार पोलिसांना आला. या फोनचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने नियंत्रण कक्षाला अलर्ट करत वांद्रे रेल्वे स्थानकावर शोधमोहीम राबवली. दोन तासाच्या तपासणीनंतर पोलिसांनी स्थानक परिसरात कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळून आली नसली तरी स्थानक परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्यानंतर देशभरातील सर्वच सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमुळे आधीच कडक सुरक्षा व्यवस्था आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर देशातील महत्वाची रेल्वे स्थानके आणि संवेदनशील परिसरात सुरक्षा यंत्रणांना गस्त वाढविण्यात आली आहे. त्यातच रविवारी खार पोलीस ठाण्यात एक निनावी फोन आला होता. फोनवरून लवकरच वांद्रे रेल्वे स्थानक स्फोटकांनी उडवून देणार असल्याची धमकी देण्यात आली होती. या फोननंतर संपूर्ण यंत्रणा कंबर कसली आहे. मात्र स्थानक परिसरात संशयास्पद काहीही आढळून आलेले नाही. पोलिसांनी या फोनची माहिती काढली असता हा फोन अमेरिकेतून आल्याचं तपासात उघड झालं आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत खार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

Web Title: Shocking! Threatens for bomb blast to destroy Bandra station from US

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.