कार्यालयाच्या पार्किंगमध्येच केली सिद्धार्थ संघवींची हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 05:32 PM2018-09-10T17:32:56+5:302018-09-10T17:35:13+5:30

याप्रकरणी एन.एम.जोशी मार्ग पोलिसांनी अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपी सरफराज शेखला अटक केली आहे. तर अन्य आरोपीही पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती समजत आहे. 

Siddharth Sanghvi murder case was done in the parking lot of the office | कार्यालयाच्या पार्किंगमध्येच केली सिद्धार्थ संघवींची हत्या 

कार्यालयाच्या पार्किंगमध्येच केली सिद्धार्थ संघवींची हत्या 

Next

मुंबई - एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी याचा मृतदेह अखेर पोलिसांना पाच दिवसानंतर हाती लागला आहे. कल्याणमधूल हाजी मलंग रोडवर काकडवाल गावातील डबक्यात कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह सोमवारी सकाळी ७.३० वाजता सापडला. त्यांच्या खिशात बँकेचे ओळखपत्र आढळून आले असून चेहरा पूर्णपणे खराब झालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यांच्या अंगावरील कपड़े आणि खिशातील ओळखपत्रावरुन कुटुंबियांनी त्यांचा मृतदेह ओळखला आहे. शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी एन.एम.जोशी मार्ग पोलिसांनी अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपी सरफराज शेखला अटक केली आहे. तर अन्य आरोपीही पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती समजत आहे. 

एचडीएफसीच्या कमला मिल येथील लोअर परेल शाखेत 2007 मध्ये वरिष्ठ व्यवस्थापक (सिनिअर मॅनेजर) म्हणून सिद्धार्थ संघवी बँकेत रुजू झाले. आपल्या कामाच्या जोरावर संघवी बँकेच्या उपाध्यक्ष पदापर्यंत पोहचले.11 वर्षांच्या कालावधीत तीन वेळा मिळालेल्या पदोन्नतीमुळे सहकाऱ्यांचा जळफळाट होत होता. यातूनच सहकाकाऱ्यांनी त्याचा काटा काढण्याचा कट रचला. बुधवारी सायंकाळी संघवी कंपनीच्या पार्किंगमध्ये असताना आरोपींनी त्यांची हत्या केली. त्यानंतर त्यांचा मृतदेह कपड्यात गुंडाळून कल्याणच्या हाजीमलग रोडवरील काकडवाल गावाजवळ फेकून दिला. संघवीच्या बेपत्ता झाल्याची तक्रार घरातल्यांनी नोंदवल्यानंतर पोलिस कामाला लागले. तपासात या प्रकरणात हत्येचा संशय असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास सुरू केला. या हत्येच्या संशया प्रकरणी पोलिसांनी संघवी यांचे साथीदार आणि  चालक अशा चौघांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. सिद्धार्थ यांची हत्या केल्याची कबुली चौघांपैकी एकानेच पोलिसांकडे दिली होती. चौघा संशयितांपैकी दोघेजण सिद्धार्थ यांचे सहकारी आहेत, तर एक कॅब चालक आणि एक कॉन्ट्रॅक्ट किलर आहे. 20 वर्षीय कॉन्ट्रॅक्ट किलर रईस उर्फ सरफराज शेखने सिद्धार्थ यांचा मृतदेह कल्याणजवळ विल्हेवाट लावल्याची माहिती पोलिसांना दिली. तर संघवी यांच्या कार्यालयाच्या पार्किंगमध्ये रक्ताचे वर्ण दिसून आले आहे. न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या पथकाने हे सर्व पुरावे ताब्यात घेतले असून त्या दृष्टीकोनातून तपास सुरू आहे.

Web Title: Siddharth Sanghvi murder case was done in the parking lot of the office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.