२६५ केंद्रावरील ४८६ अंगणवाडीसेविका संपावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 05:00 PM2017-09-29T17:00:12+5:302017-09-29T17:01:43+5:30

उर्वरित अंगणवाड्या नियमित सुरू

486 Anganwadi workers on 265 centers | २६५ केंद्रावरील ४८६ अंगणवाडीसेविका संपावरच

२६५ केंद्रावरील ४८६ अंगणवाडीसेविका संपावरच

Next
ठळक मुद्दे२३ सप्टेंबरपासून  जिल्हयातील १८३९ अंगणवाडी केंद्र नियमित सुरू झालेली आहेत.  साक्री, पिंपळनेर, व दहीवेल या भागातील  २६५ केंद्रावरील ४८६ अंगणवाडी सेविका, मदतनीस, अद्यापही संपावर आहेत.तेथील अंगणवाडी केंद्रातील बालकांना बचतगटाच्या माध्यमातून नियमितपणे पोषण आहार


लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शासनाने दिलेली मानधनवाढ समाधानकारक नसल्याचे कारण देत जिल्ह्यातील २६५ केंद्रावरील ४८६ अंगणवाडीसेविका, मदतनीस, या अजुनही संपावर असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या एकात्मिक महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आलेली आहे.
अंगणवाडी सेविकांना किमान १८ हजार रूपये मासिक वेतन देण्यात यावे, सेवानिवृत्तीच्या लाभाची रक्कम एक लाखा ऐवजी दोन लाख रूपये करण्यात यावी, अंगणवाडी सेविकांना वर्ग चारचा दर्जा देण्यात यावा यासह विविध त्यांनी  ९ सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारलेला होता. जिल्ह्यातील २१०४ अंगणवाड्यांमधील सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाड्यामधील कर्मचारी संपात सहभागी झाल्या होत्या.
दरम्यान महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी सेविकांना १५०० रूपये, मदतनीसांना १ हजार रूपये तर मिनी अंगणवाडी सेविकांना १२५० रूपये दरमहा मानधनवाढ व भाऊबीज एक हजार रूपये ऐवजी दोन हजार रूपये देण्याचे प्रस्ताव ठेवला. महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने शासनाची भूमिका मान्य करीत संप मागे घेतला.  २३ सप्टेंबरपासून  जिल्हयातील १८३९ अंगणवाडी केंद्र नियमित सुरू झालेली आहेत. 
मात्र शासनाने प्रस्तावित केलेली मानधानवाढ समाधानकारक नसल्याने जिल्ह्यातील साक्री, पिंपळनेर, व दहीवेल या भागातील  २६५ केंद्रावरील ४८६ अंगणवाडी सेविका, मदतनीस, अद्यापही संपावर आहेत. यात २४१ सेविका, २२१ मदतनीस व २४ मीनी अंगणवाडीसेविका यांचा समावेश आहे. 
दरम्यान साक्री, पिंपळनेर, दहीवेल या भागातील अंगणवाडीसेविका, मदतनीस संपावर असल्या तरी तेथील अंगणवाडी केंद्रातील बालकांना बचतगटाच्या माध्यमातून नियमितपणे पोषण आहार दिला जात असल्याची माहिती एकात्मिक महिला व बालविकास विभागाचे कक्ष अधिकारी शा.ना.जगताप यांनी दिली.

Web Title: 486 Anganwadi workers on 265 centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.