डेंग्यूच्या पाश्र्वभूमीवर धुळे महापालिकेचे नियोजन!
By admin | Published: June 12, 2017 12:24 PM2017-06-12T12:24:28+5:302017-06-12T12:24:28+5:30
मनपा आरोग्य विभाग : कर्मचारी वाढीची मागणी, प्रत्येक प्रभागात जनजागृती मोहीम
Next
ऑनलाईन लोकमत
धुळे,दि.12 : जिल्ह्यासह शहरात गेल्या वर्षी डेंग्यूने थैमान घातल्याने मनपा प्रशासन जोरदार टीकेचे लक्ष्य ठरले होत़े त्यामुळे यंदा आरोग्य विभागाने आताच नियोजन सुरू केले असून पुढील आठवडय़ात प्रत्येक प्रभागात जनजागृती मोहीम हाती घेण्यात येणार आह़े, तसेच कर्मचारी संख्या वाढीचेही नियोजन सुरू आह़े
डेंग्यू निर्मूलनासाठी आरोग्य विभागाचे नियोजन सुरू झाले असून प्रत्येक प्रभागात जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आह़े तसेच डेंग्यूच्या पाश्र्वभूमीवर धुरळणी, फवारणीसाठी लागणारी औषधे व साहित्य उपलब्ध करून घेण्यात आले आहेत़
66 कर्मचा:यांची मागणी
वाढीव कर्मचारी मिळावे, यासाठी स्थायी समितीला प्रस्ताव दिला आह़े सद्य:स्थितीत मलेरिया विभागाकडे स्प्रेईंग, अॅबेटिंग, फॉगिंग इ़ साठी 21 कर्मचारी कार्यरत आहेत़ मात्र, डेंग्यूच्या पाश्र्वभूमीवर प्रभावी उपाययोजनांसाठी 66 कर्मचारी आवश्यक आहेत़ पुरेसे कर्मचारी उपलब्ध न झाल्यास डेंग्यू व मलेरियाची साथ पसरू शकते, असे पत्र सहायक आरोग्याधिका:यांनी आधीच स्थायी समितीला दिले होत़े मात्र 25 मेच्या स्थायीच्या सभेत सदर विषय तहकूब झाला असून तो पुन्हा स्थायीत मांडला जाऊन त्याबाबत निर्णय होऊ शकतो़
50 लाखांची तरतूद
यंदाच्या अंदाजपत्रकात डेंग्यूबाबतच्या उपाययोजनांसाठी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आह़े गेल्या वर्षी शहरात शंभरापेक्षा अधिक डेंग्यूचे तर दोन रुग्ण मलेरियाचे आढळले होत़े सध्याचे वातावरण डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांसाठी पोषक असून आतापासूनच जनजागृती व नियोजन सुरू करण्यात आले आह़े