धुळे येथे इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनास सुरवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 03:39 PM2018-02-07T15:39:51+5:302018-02-07T15:41:01+5:30

प्रदुषणमुक्ती, सौरउर्जेवर भर, प्रदर्शनात १८५ उपकरणे मांडले

Inspire Award for Science Exhibition at Dhule | धुळे येथे इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनास सुरवात

धुळे येथे इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनास सुरवात

Next
ठळक मुद्देविज्ञान प्रदर्शनाचे ७ वे वर्षप्रदर्शनात तीन जिल्ह्यातून १८५ उपकरणे मांडलीप्रदुषणमुक्ती, सौरउर्जेवर सर्वाधिक भर

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : तीन दिवसीय इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनास येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये बुधवारी सकाळी थाटात प्रारंभ झाला. या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी प्रदुषणमुक्ती, सौरउर्जा, पर्यावरण या विषयावर अधिक भर दिला आहे.
विज्ञान व तंत्रज्ञान विभाग नवीदिल्ली, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवीनगर नागपूर व शिक्षण विभाग धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने हे जिल्हा विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले आहे. धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील १८५ उपकरणे यात मांडण्यात आली आहेत. 
विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी. यांच्याहस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रविण अहिरे, डायटच्या प्राचार्या डॉ. विद्या पाटील, राज्य विज्ञान व तंत्रज्ञान विभाग नवीदिल्लीचे सिनीअर एनोव्हेशन फेलो कांती पटेल, छत्रपती शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक डी.पी. राजपूत आदी होते.
यावेळी बोलतांना गंगाथरन डी. म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड बुद्धीमत्ता आहे.त्यांच्याकडे नवनवीन कल्पना आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता ओळखून शिक्षकांनी त्यांना चालना दिली पाहिजे.  विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नांचे निरसन करण्याचा प्रयत्न शिक्षकांनी केला पाहिजे.
कांती पटेल म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये नवीन करण्याची क्षमता निर्माण झाली पाहिजे. यातूनच चांगले शास्त्रज्ञ निर्माण होवू शकतात. 
डॉ. विद्या पाटील यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रविण अहिरे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार डी.पी.मराठे यांनी केले.
१८५ उपकरणे मांडले
या इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात  १८५ उपकरणे मांडण्यात आली आहे. त्यात धुळे जिल्ह्यातील ८६, जळगाव जिल्ह्यातील ५९ तर नंदुरबार जिल्ह्यातील ४० उपकरणांचा समावेश आहे. 


 

Web Title: Inspire Award for Science Exhibition at Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.