संगनमताने काढला कुंडाणे येथील तरुणाचा काटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 11:21 AM2017-12-12T11:21:45+5:302017-12-12T11:23:56+5:30
गोळी झाडली : घटनास्थळी पोलीस दाखल, तिघांना अटक, दोघे फरार
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : पाच जणांनी संगनमत करुन एकावर गावठी कट्याची गोळी झाडली़ यात त्याचा मृत्यू ओढवला़ ही घटना सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास धुळे तालुक्यातील कुंडाणे (वार) याठिकाणी घडली़ मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला़ तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असून दोन जण फरार झाले आहेत़
कुंडाण्यात रात्रीचा थरार
धुळे तालुक्यातील कुंडाणे (वार) शिवारातील कुंडाणे फाट्याच्या पुढे असलेल्या एका पडीत घराजवळ हा थरार घडला़ सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास दीपक दगडू वाघ (२८) रा़ कुंडाणे (वार) याच्यावर गावठी कट्यातून गोळी झाडण्यात आली़ ही गोळी त्याच्या खांद्याला लागली आहे़ घटना घडल्यानंतर मारेकरी लागलीच घटनास्थळावरुन पळून गेले़ दीपक वाघ याला जखमी अवस्थेत हिरे वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय उपचारासाठी आणण्यात आले़ उपचार सुरु असताना त्याची प्राणज्योत मालवली़
अधिकारी पोहचले घटनास्थळी
घटनेचे वृत्त कळताच धुळे विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी हिम्मत जाधव, साक्रीचे निलेश सोनवणे, धुळे तालुका पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे, पोलीस उपनिरीक्षक आऱ एस़ माळी यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला़ मारेकºयांचा शोध घेण्यात आला़
पोलिसात गुन्हा दाखल
या प्रकरणी साहेबराव विठ्ठल वाघ रा़ कुंडाणे (वार) यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, संशयित अभय दिलीप अमृतसागर (रा़ कुंडाणे), पंकज परशराम जिसेजा (रा़ मोगलाई), भांग्या उर्फ मुकेशनाना उर्फ मुरलीधर अमृतसागर (रा़ रेल्वेस्टेशन रोड), पंकज उर्फ भुºया जीवन बागले (रा़ रमाईनगर, धुळे), गोटू दगडसिंग पावरा (रा़ कुंडाणे ता़ धुळे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ यातील अभय अमृतसागर, पंकज जिसेजा आणि गोटू पावरा यांना अटक करण्यात आली आहे़ तर भांग्या उर्फ मुकेशनाना उर्फ मुरलीधर अमृतसागर आणि पंकज उर्फ भुºया जीवन बागले हे दोघे फरार झाले आहेत़
मृतदेहाचे शवविच्छेदन
सोमवारी रात्री दीपक दगडू वाघ याच्यावर गावठी कट्याने गोळी झाडल्यानंतर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले़ यात त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मंगळवारी सकाळी आणण्यात आला असून शवविच्छेदन करण्याचे काम सुरु झाले आहे़ या घटनेची चर्चा गावात सुरु होती़