चेन्नई एक्सप्रेसमध्ये 'बॉम्ब' असल्याची गुप्त माहिती, रेल्वे थांबवून पोलीस पथकांचा कसून तपास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 06:08 PM2018-10-21T18:08:41+5:302018-10-21T18:09:27+5:30
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी ही चेन्नई-जोधपूर एक्सप्रेस थांबविली आहे. त्यानंतर, रेल्वेच्या प्रत्येक डब्याची पोलिसांकडून तपासणी केली जात आहे.
धुळे - रेल्वेत बाँम्ब असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने चेन्नई - जोधपूर एक्सप्रेस दुपारी साडे चार वाजल्यापासून थांबविण्यात आली आहे. या रेल्वेची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. चेन्नई एक्सप्रेसमध्ये बॉम्बच्या घटनेने रेल्वेतील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. तर प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर येताच, रेल्वेतून बाहेर पडणे पसंत केलं.
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी ही चेन्नई-जोधपूर एक्सप्रेस थांबविली आहे. त्यानंतर, रेल्वेच्या प्रत्येक डब्याची पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. धुळ्याहून पोलिसांचे बाँम्ब शोधक पथक मागविण्यात आले आहे. रेल्वेतील सर्व प्रवाशांना खाली उतरविण्यात आले आहे. या घननेमुळे रेल्वे स्थानक परिसरात गोंधळ उडाला असून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून प्रवाशांच्याही बॅगांची कसूनन तपासणी करण्यात येत आहे.