वाईन शॉप बंद न केल्यास पालकमंत्र्यांसमोर आत्मदहन
By admin | Published: July 6, 2017 12:45 PM2017-07-06T12:45:03+5:302017-07-06T12:45:03+5:30
धुळ्यात महिला संघर्ष समितीचे जिल्हाधिका:यांना निवेदन
Next
ऑनलाईन लोकमत
धुळे,दि.6 - शहरातील नकाणे रोडवरील प्रमोदनगर सेक्टर दोनमध्ये असलेले कुणाल परमिट रूम व प्रिन्स वाईन शॉप कायमस्वरूपी बंद करावे, अन्यथा 15 जुलै रोजी पालकमंत्र्यांसमोर आत्मदहन करण्याचा इशारा प्रमोदनगर महिला संघर्ष समितीतर्फे बुधवारी जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे देण्यात आला़
प्रमोदनगरातील दोन्ही वाईन शॉप बंद करण्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही़ 25 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची प्रशासनाकडून दखल घेतली गेली नाही़ त्याचप्रमाणे कुणाल परमिट रूम व बियरबारच्या हॉटेलची जागा पूर्णपणे अतिक्रमणात असून मनपा धुळे यांच्याकडून मोजणी झाली आह़े या मोजणीनुसार हॉटेलची व पार्किगची जागा शासनाची असून त्यावर झालेल्या अतिक्रमणाचा खुलासा करून ते हटविण्यात यावे, असे निवेदनात नमूद आह़े या भागातील एका घरात वाईन शॉप स्थलांतरित केले आह़े या दुकानास वाणिज्य परवाना मिळू नये यासाठी नगरसेवक कमलेश देवरे यांनी मनपाला निवेदन दिले आह़े या वेळी नगरसेवक कमलेश देवरे, प्रतिभा चौधरी, वैभवी दुसाने, पी़आऱ जोशी, वैशाली पाटील, पुष्पलता जोशी, हर्षदा जोशी, मेघल चौधरी आदींची उपस्थिती होती़