धुळ्यातील जे. आर. सिटी शाळेत जनजाती संस्कृती रक्षा संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 08:48 PM2017-12-09T20:48:27+5:302017-12-09T20:49:29+5:30

दत्तात्रय पवार : लेझीम पथकाने वेधले लक्ष 

Which R. Conference on tribal culture in city school | धुळ्यातील जे. आर. सिटी शाळेत जनजाती संस्कृती रक्षा संमेलन

धुळ्यातील जे. आर. सिटी शाळेत जनजाती संस्कृती रक्षा संमेलन

Next
ठळक मुद्देसंमेलनाच्या शेवटी संजय नरगान व विजय पावरा यांनी दोन ठरावांचे वाचन केले. पहिला ठराव हा जनजाती समाजाची परंपरागत आस्था आणि देवस्थानांचे संरक्षण तसेच त्यांच्या बोली भाषांचा विकास व्हावा, यासंबंधी होता. दुसरा ठराव हा धर्मांतरणांच्या दुष्परिणामांचे अध्ययन करण्यासाठी एक केंद्रीय चौकशी आयोगाची स्थापना करावी, अशी मागणी करण्यात आली.संमेलनापूर्वी वनवासी क न्या संस्कार केंद्राच्या मुलींच्या लेझीम पथकाने चित्तवेधक प्रात्यक्षिक सादर करून येथे उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विजय पावरा यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. 

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : देशात एकूण ४०० जाती आहेत. त्यात महाराष्टÑ राज्यात २४ प्रमुख जनजाती आहेत. वनवासी समाज हा प्रामाणिक आहे. ‘वनवासी, ग्रामवासी आम्ही सर्व भारतवासी’ या संकल्पनेतूनच वनवासी कल्याण आश्रम काम करते, असे प्रतिपादन दत्तात्रय पवार यांनी येथे केले. दरम्यान, संमेलनापूर्वी विद्यार्थिनींनी लेझीमचे प्रात्यक्षिक सादर करून लक्ष वेधून घेतले. 
वनवासी कल्याण आश्रमतर्फे जनजाती रक्षा संमेलनाचे आयोजन शनिवारी जे. आर. सिटी हायस्कूलच्या मैदानात करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी संमेलन समितीचे स्वागताध्यक्ष डॉ.जितेंद्र ठाकूर, देवगिरी प्रांताचे अध्यक्ष चैत्राम पवार, प्रा. बी. एस. काळे, के. के. पावरा, संजय नरगान आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. संजय पाडवी यांनी केले. आभार अनारसिंग पावरा यांनी मानले. 
सकारात्मक विचार करून विकास साधावा
वनवासी समाज हा अल्पसंतुष्ट असला तरी तो समाधानी आहे. वनवासी कल्याण आश्रम हे माध्यम म्हणून काम करते. तरुणांनी सकारात्मक विचार करून आपला विकास साधला पाहिजे. तसेच आपल्या संस्कृतीचे रितीरिवाजांचे संरक्षण केले पाहिजे, असे त्यांनी येथे नमूद केले. 
संस्कृती संवर्धनासाठी संमेलन 
प्रास्ताविक वनवासी कल्याण आश्रमाचे जिल्ह्याचे सचिव प्रा. बी. एस. काळे यांनी केले. ते म्हणाले, की जनजाती संस्कृती रक्षा संमेलनाचा मुख्य उद्देश हा आपली संस्कृती रक्षणाचा संकल्प करण्यासाठी व संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी असल्याचे सांगितले. वनवासी कल्याण आश्रम ही सेवाभावी संस्था गेल्या ६५ वर्षांपासून वनवासींच्या कल्याणासाठी काम करत आहे. धुळे जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यातील शिरपूर व साक्री तालुक्यात वनवासी कल्याण आश्रमाचे काम मोठ्या प्रमाणात आहे. तसेच धुळे व शिंदखेड्यातही काम सुरू झाले आहे. जिल्ह्यातील ६२ गावांतील १०४ प्रकल्प वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून चालत असल्याचे त्यांनी येथे सांगितले. 
रितीरिवाजांची जपवणूक करा 
के. के. पावरा म्हणाले, की आदिवासी संस्कृती लोप पावत चालली आहे. दिवसेंदिवस तिच्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्या संस्कृतीच्या चालीरिती, रिवाज, जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे संस्कार यांची जपवणूक केली पाहिजे, असे आवाहन केले. या वेळी त्यांनी आदिवासी भाषेत गीते सादर करून येथे उपस्थितांची मने जिंकली. या वेळी चैत्राम पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. 
दुर्गम भागात सुधारणा पाहिजे
डॉ. जितेंद्र ठाकूर म्हणाले, की दुर्गम भागातील लोकांना रोजगार, कुपोषण, शिक्षण, बालसंस्कार, आरोग्य या समस्या व अडीअडचणींना तोंड द्यावे लागते. यात सुधारणा झाली पाहिजे. आदिवासी संस्कृती  जतन करावी, असा सल्ला त्यांनी दिला. 

Web Title: Which R. Conference on tribal culture in city school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.