Atal Bihari Vajpayee : साधे जीवन, उच्च विचार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 03:37 AM2018-08-17T03:37:27+5:302018-08-17T03:38:25+5:30

अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेप्रमाणे त्यांचे व्यक्तिमत्त्वदेखील तितकेच प्रभावी होते. आयुष्यभर सर्वसामान्यत्व जपलेला हा मनुष्य ‘साधे जीवन, उच्च विचार’ या उक्तीप्रमाणेच जगला.

Atal Bihari Vajpayee: simple life, high thoughts | Atal Bihari Vajpayee : साधे जीवन, उच्च विचार

Atal Bihari Vajpayee : साधे जीवन, उच्च विचार

googlenewsNext

- मा.गो. वैद्य, ( माजी प्रवक्ते, रा.स्व. संघ)

अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेप्रमाणे त्यांचे व्यक्तिमत्त्वदेखील तितकेच प्रभावी होते. आयुष्यभर सर्वसामान्यत्व जपलेला हा मनुष्य ‘साधे जीवन, उच्च विचार’ या उक्तीप्रमाणेच जगला. अगदी खासदार असतानादेखील स्वत:चे कपडे ते धुवत असत. जिव्हेवर सरस्वती अन् मनात भारतमाता घेऊन जगणारे अटलजी अलौकिकच होते. नागपुरात अटलबिहारी वाजपेयी यांनी संघ तृतीय शिक्षा वर्गात प्रशिक्षण घेतले होते.
या शिक्षा वर्गात अटलजींची वक्तृत्वावरील पकड, कवितेची जाण आणि लाघवी व्यक्तिमत्त्व अनुभवयाची पहिल्यांदा संधी मिळाली. अनेक स्वयंसेवक त्यांच्यापासून प्रभावित झाले होते.
अटलबिहारी वाजपेयी १९६१ ते १९६६ या कालावधीत जनसंघाच्या कामाने अनेकदा नागपूरला आले. एरवी ते महानगर अध्यक्ष सुंदरलाल रॉय यांच्या घरी थांबत. मात्र रॉय शहरात नसल्यामुळे अटलबिहारी वाजपेयी एकदा माझ्या निवासस्थानी थांबले. त्यावेळी खासदार असूनदेखील त्यांनी खाली बसूनच जेवण करणे पसंत केले व कपडेदेखील स्वत: धुतले.
विनोदी ‘काले’ कविता
१९४५ च्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचे सर्वाधिकारी मल्हारराव काळे हे होते. अटलजी हिंदी भाषेत त्यांना ‘काले’ असे म्हणत. शिक्षा वर्गात सायंकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमांत अटलजींनी ‘रेशमबाग की मिट्टी काली, नाग नदी का पानी काला और...हमारे सर्वाधिकारी भी काले’ अशी कविता म्हणून सर्वांनाच पोट धरुन हसायला भाग पाडले होते.

Web Title: Atal Bihari Vajpayee: simple life, high thoughts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.