स्पर्धेआधीच चीतपट

By admin | Published: July 27, 2016 03:42 AM2016-07-27T03:42:36+5:302016-07-27T03:42:36+5:30

आॅलिम्पिक स्पर्धेला काही दिवस शिल्लक असतानाच भारतीय कुस्ती क्षेत्राला आणि भारतीय क्रीडा विश्वासाला जबर धक्का बसला तो पदकाचे आशास्थान असलेला नरसिंग यादव डोपिंगमध्ये

Chattapat already before the competition | स्पर्धेआधीच चीतपट

स्पर्धेआधीच चीतपट

Next

आॅलिम्पिक स्पर्धेला काही दिवस शिल्लक असतानाच भारतीय कुस्ती क्षेत्राला आणि भारतीय क्रीडा विश्वासाला जबर धक्का बसला तो पदकाचे आशास्थान असलेला नरसिंग यादव डोपिंगमध्ये (उत्तेजक पदार्थ सेवन चाचणी) अडकल्यामुळे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक पटकावून भारतासाठी आॅलिम्पिक प्रवेश निश्चित केलेल्या नरसिंगने याआधी दोनदा आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या पदक विजेत्या सुशील कुमारसह चांगलाच वाद घातला होता. त्यासाठी न्यायालयाचे दार ठोठावले. आॅलिम्पिकमध्ये दोनदा पदक पटकावले असल्याने सुशीलकुमारने आपली दावेदारी स्पष्ट केली आणि त्याचवेळी भारताला आॅलिम्पिक प्रवेश मिळवून दिल्याने नरसिंगने आपली बाजू मांडली व त्याला अनेकांचा पाठिंबाही मिळाला. न्यायालयानेही नरसिंगच्या बाजूने निकाल देत अनुभवी सुशीलला ‘मॅट’बाहेर बसवले. मात्र आता हाच नरसिंग डोपिंगमध्ये अडकल्याने त्यापायी देशाची प्रतिमा डागाळल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात येत आहे. अर्थात याबाबत अजून अंतिम निर्णय झाला नसला तरी नरसिंग यंदाच्या आॅलिम्पिकमध्ये खेळू शकणार नाही हे जवळजवळ निश्चित आहे. त्याचबरोबर आॅलिम्पिकमधील खेळाडू निश्चित करण्याची अखेरची तारीख निघून गेली असल्याने नरसिंग ऐवजी दुसरा खेळाडूही भारताला पाठवता येणार नाही. त्यामुळे ७४ किलो वजनी गटात भारत स्पर्धेआधीच चीतपट झालेला असेल. डोपिंगमध्ये भारतीय खेळाडू अडकणे ही काही पहिली वेळ नाही. दुखापती टाळण्यासाठी, तंदुरुस्ती टिकवण्यासाठी ज्या औषधांचे सेवन केले जाते ते औषध जागतिक स्तरावर बंदी घातलेले आहे की, नाही हे तपासून पाहाणे ही प्रत्येक खेळाडूची जबाबदारी आहे. ती पार पाडली जात नाही व हाच निष्काळजीपणा खेळाडूंना महागात पडतो. कुस्तीला न्यायालयाच्या मैदानावर घेऊन गेलेला नरसिंग डोपिंगमध्ये अडकल्याने त्याच्यावर चौफेर टीका होणे साहजिकच आहे. त्याचवेळी पूर्ण निर्णय लागेपर्यंत नरसिंगला धारेवर धरणेही चुकीचे ठरेल. कारण याआधी कोणत्याही निवड चाचणी किंवा तपासणीला नरसिंगने कधीच विरोधही केला नव्हता. त्याने ज्या खेळाडूला आव्हान दिले तो नवा नव्हता. तरीही पूर्ण निर्णय लागेपर्यंत नरसिंगला धारेवर धरणेही चुकीचे ठरेल.

Web Title: Chattapat already before the competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.