The Accidental Prime Minister चा पहिला लूक, मनमोहन सिंग यांच्या भूमिकेत अनुपम खेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 22:07 IST2018-04-05T22:07:16+5:302018-04-05T22:07:50+5:30
बॉलिवूडमधील ख्यातनाम अभिनेते अनुपम खेर यांनी आज आपल्या ट्विटर हँडलवरून दोन फोटो शेअर केले आणि या फोटोंवरून सोशल मिडीयावर बरीच चर्चा सुरू झाली. या फोटोमध्ये पगडी घातलेले आणि पांढरी दाढी असणा-या अनुपम खेर यांना पाहून सोशल मिडीयावर या लूकविषयी चर्चा सुरू झाली.

The Accidental Prime Minister चा पहिला लूक, मनमोहन सिंग यांच्या भूमिकेत अनुपम खेर
- अजय परचुरे
मुंबई : बॉलिवूडमधील ख्यातनाम अभिनेते अनुपम खेर यांनी आज आपल्या ट्विटर हँडलवरून दोन फोटो शेअर केले आणि या फोटोंवरून सोशल मिडीयावर बरीच चर्चा सुरू झाली. या फोटोमध्ये पगडी घातलेले आणि पांढरी दाढी असणा-या अनुपम खेर यांना पाहून सोशल मिडीयावर या लूकविषयी चर्चा सुरू झाली. द एक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर या आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक आज सोशल मिडीयावर प्रसारित करण्यात आला. या सिनेमाचं वैशिष्ठय म्हणजे यात अनुपम खेर चक्क भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची व्यक्तिरेखा साकारत आहेत. आपल्या पंतप्रधान कार्यालयातील खिडकीतून बाहेर पाहणारे आणि नमस्कार करणारे पंतप्रधान असे दोन फोटो आज व्हायरल झाले आणि सोशल मिडियावर अनुपम खेर यांच्या लूकविषयी चर्चांना उधाण आलं.
या सिनेमांचं दिग्दर्शन करतायत विजय रत्नाकर गुट्टे . संजय बारू यांच्या द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर या पुस्तकाचा आधार घेऊन हि फिल्म करण्यात येत आहे. सध्या या सिनेमाचं शूटींग सुरू आहे. अनुपम खेर सध्या सोशल मिडियावरून दररोज त्यांना येणा-या शूटींगचे अनुभव शेअर करतायत. अत्यंत विन्रम आणि शांत अशी प्रतिमा असणा-या मनमोहन सिंग यांची भूमिका साकारायला मिळणं हे मी माझं भाग्य समजतो अशी प्रतिक्रियाही अनुपम खेर यांनी ट्विटरवर दिली आहे.