फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात 'दंगल'ची बाजी
By Admin | Published: January 15, 2017 12:45 AM2017-01-15T00:45:12+5:302017-01-15T06:19:32+5:30
अवघे बॉलिवूड ज्या पुरस्कार सोहळ्याची अत्यंत आतुरते वाट पाहते, तो 62 वा जिओ फिल्मफेअर पुरस्कार सोहळा शनिवारी रात्री दिमाखात पार पडला.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - अवघे बॉलिवूड ज्या पुरस्कार सोहळ्याची अत्यंत आतुरते वाट पाहते, तो 62 वा जिओ फिल्मफेअर पुरस्कार सोहळा शनिवारी रात्री दिमाखात पार पडला. 2017 मधील या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या बहुचर्चित 'दंगल'नेच बाजी मारली आहे.
'दंगल' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केल्यानंतर फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सुद्धा 'दंगल' उडवून दिली आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून 'दंगल'ला गौरविण्यात आले. या चित्रपटातील अभिनेता आमिर खानला सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि नितेश तिवारी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून सन्मानित करण्यात आले. तर, 'उडता पंजाब' या चित्रपटातील भूमिकेसाठी अलिया भट हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याचबरोबर या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्काराने गौरविण्यात आले. तर, अभिनेता ऋृषी कपूर यांना 'कपूर अॅण्ड सन्स' या चित्रपटातील भूमिकेसाठी आणि अभिनेत्री शबाना आझमी यांना 'नीरजा' चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक म्हणून पुरस्कार देण्यात आला.
फिल्मफेअर सोहळ्यातील पुरस्कार खालीलप्रमाणे...
सर्वोत्कृष्ट चित्रपट - दंगल
सर्वोत्कृष्ट अभिनेता - अमिर खान, दंगल
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - आलिया भट, उडता पंजाब
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - नितेश तिवारी, दंगल
समीक्षक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - सोनम कपूर, नीरजा
सर्वोत्कृष्ट अभिनेता (लघुपट) - मनोज वाजपेयी, तांडव
सर्वोत्कृष्ट लघुपट (नॉन- फिक्शन) - मातीतली कुस्ती
सर्वोत्कृष्ट लघुपट (फिक्शन) - ज्योती कपूर दास, चटनी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (लघुपट) - तिस्का चोप्रा, चटनी
सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक - अश्विनी अयेर तिवारी, निल बटे सन्नाटा
सर्वोत्कृष्ट संवाद - रितेश शाह, पिंक
सर्वोत्कृष्ट पटकथा - शक्तुन बत्रा आणि अयेशा देवित्रे, कपूर अॅण्ड सन्स
सर्वोत्कृष्ट कथा - शक्तुन बत्रा आणि अयेशा देवित्रे, कपूर अॅण्ड सन्स
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता- दिलजीत दुसान, उडता पंजाब
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री - हृतिका सिंग, साला खडूस
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - ऋृषी कपूर, कपूर अॅण्ड सन्स
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - शबाना आझमी, नीरजा
सर्वोत्कृष्ट गीतकार - अमिताभ भट्टाचार्य, ऐ दिल है मुश्कील
सर्वोत्कृष्ट म्युजिक अल्बम - प्रितम, ऐ दिल है मुश्कील
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - अरजित सिंग, ऐ दिल है मुश्कील
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - नेहा भासिन, सुलतान
सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट - रेड चिलीज्, फॅन
सर्वोत्कृष्ट इडिटिंग - मोनिशा बालदावा, नीरजा
सर्वोत्कृष्ट वेशभूषा - पायल सलुजा, उडता पंजाब
सर्वोत्कृष्ट अॅक्शन - श्याम कौशल, दंगल