बर्थडे स्पेशल : जाणून घ्या बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री डिंपल कपाडियाच्या खास गोष्टी!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2018 12:28 PM2018-06-08T12:28:17+5:302018-06-08T12:35:37+5:30
डिंपल कपाडिया ही बॉलिवूडची अशी एकुलती एक अभिनेत्री असेल जिने पहिला सिनेमा सुपरहिट झाल्यानंतरच अनेक वर्ष सिनेमांपासून दूर राहिली होती.
मुंबई : आपल्या पहिल्याच सिनेमातून बॉलिवूडमध्ये धमाका करणारी अभिनेत्री डिंपल कपाडियाचा आज आजदिवस. डिंपल कपाडिया ही बॉलिवूडची अशी एकुलती एक अभिनेत्री असेल जिने पहिला सिनेमा सुपरहिट झाल्यानंतरच अनेक वर्ष सिनेमांपासून दूर राहिली होती. डिंपलचा दुसरा सिनेमा तब्बल 12 वर्षांनी आला होता. कारण तिने लग्न केले होते. चला जाणून घेऊया डिंपल कपाडियाच्या अशाच काही खास गोष्टी....
1) डिंपल कपाडियाचा जन्म 8 जून 1957 मध्ये एका गुजराती परिवारात झाला होता. त्याशिवाय तिच्या परिवाराविषयी फार माहिती कुणाला नाही.
2) डिंपल ही बॉलिवूडमध्ये आपल्या बोल्ड अंदाजासाठीच ओळखली जात होती. 'बॉबी' या पहिल्याच सिनेमातच तिने अनेक बोल्ड सीन देऊन सर्वांना धक्का दिला होता.
3) डिंपलला अभिनेते राज कपूर यांनी सिनेमात ब्रेक दिला होता. 1973 मध्ये आलेल्या बॉबी या सिनेमात डिंपल पहिल्यांदा दिसली होती. या सिनेमात ऋषी कपूर मुख्य भूमिकेत होता.
4) बॉबी सिनेमावेळी डिंपल केवळ 16 वर्षांची होती. असेही म्हटले जाते की, या सिनेमापासून ऋषी कपूर आणि डिंपल एकमेकांना डेट करत होते.
5) डिंपलने केवळ 16 वर्षांची असताना अभिनेते राजेश खन्ना यांच्याची लग्न केले होते. लग्नानंतर डिंपल अनेक वर्ष सिनेमापासून दूर होती.
6) डिंपल आणि राजेश खन्ना यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या 9 वर्षांनंतर दोघे घटस्फोट न घेता वेगळे राहत होते.
7) राजेश खन्नापासून दूर झाल्यानंतर डिंपलने 'सागर' या सिनेमातून कमबॅक केले. तिच्या याही सिनेमाचा हिरो ऋषी कपूर होता. या सिनेमात डिंपलने टॉपलेस सीन दिला होता.
8) डिंपल कपाडियाने अभिनेता अनिल कपूर यांच्यासोबतही एक इंटीमेट सीन दिला होता. हा सीन बॉलिवूडच्या सर्वात इंटीमेट सीनपैकी एक मानला जातो. हा सीन तिने 'जाबांज' सिनेमात दिला होता.
9) 1993 मध्ये डिंपल कपाडियाला 'रुदाली' या सिनेमातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते.
10) डिंपल कपाडिया आणि सनी देओल यांच्यातील अफेअरच्या चर्चाही त्यावेळी फार रंगल्या होत्या. असे सांगितले जाते की, दोघांचं अफेअर 11 वर्ष सुरु होतं.