सखी गोखलेचा हटके अंदाज!

By Admin | Published: October 31, 2016 02:24 AM2016-10-31T02:24:00+5:302016-10-31T02:24:00+5:30

सिनेमा जगात किंवा मॉडेलिंगमध्ये फोटोशूट अत्यंत महत्त्व असते. कारण कलाकारांना वेगवेगळ्या लुकमध्ये सतत अपडेट राहणे गरजेचे असते.

Happy Gokhale style! | सखी गोखलेचा हटके अंदाज!

सखी गोखलेचा हटके अंदाज!

googlenewsNext


सिनेमा जगात किंवा मॉडेलिंगमध्ये फोटोशूट अत्यंत महत्त्व असते. कारण कलाकारांना वेगवेगळ्या लुकमध्ये सतत अपडेट राहणे गरजेचे असते. थोडक्यात फोटोशूट हा कलाकारांच्या कामाचा भाग असतो. सध्या सर्वच कलाकार मोठ्या प्रमाणात फोटोशूट करताना पाहायला मिळत आहे. आता यामध्ये प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री सखी गोखले हिनेदेखील स्वत:चे फोटोशूट केले आहेत. सखीचे हे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. फोटोग्राफर तेजस नेहरूरकर याने हे फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये सखीचा एकदम हटके अंदाज दिसत आहे. सखीने दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील तिची भूमिका एकदम सोज्वळ होती. त्यामुळे तिचा हा हटके लुक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तिच्या फोटोला सोशल मीडियावर भरपूर लाइक्स मिळताना दिसत आहेत.
तसेच मालिकेनंतर सखी नाटक आणि चित्रपटात व्यग्र आहे. सध्या तिचे अमर स्टुडिओ हे नाटक चर्चेत आहे. तसेच सखी चित्रपटात येण्यासदेखील सज्ज झाली आहे. ती तिच्या पहिल्या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याच्यासोबत पाहायला मिळणार आहे. पण सखीचे हे फोटोशूट तिच्या चाहत्यांसाठी नक्कीच दिवाळी सरप्राइज असणार आहे.

Web Title: Happy Gokhale style!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.