...म्हणून सलमानने प्लॅटफॉर्मवर घालवली रात्र!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 03:26 PM2018-07-12T15:26:52+5:302018-07-12T15:50:24+5:30
मुंबई आणि मुंबईची लोकल, हे न तुटणारं समीकरण. रोज लाखो लोकं या लाईफलाईनमधून प्रवास करतात. ही लोकल ट्रेन खऱ्या अर्थाने मुंबईची लाईफ लाईन आहे याचा प्रत्यय आपल्याला येतोच. असाच काहीसा लाईफलाईनचा अनुभव बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानला आला आहे.
मुंबई आणि मुंबईची लोकल, हे न तुटणारं समीकरण. रोज लाखो लोकं या लाईफलाईनमधून प्रवास करतात. ही लोकल ट्रेन खऱ्या अर्थाने मुंबईची लाईफलाईन आहे याचा प्रत्यय आपल्याला येतोच. असाच काहीसा लाईफलाईनचा अनुभव बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानला आला आहे. बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत अभिनेत्यांमध्ये गणना होणाऱ्या सलमानने चक्क प्लॅटफॉर्मवर रात्र घालवली होती. ऐकून धक्का बसला ना? हे खरं आहे. याबद्दल खुद्द सलमानने सांगितले असून तू कधी ट्रेनमधून प्रवास केला आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना सलमानने याबाबत सांगितले होते.
बॉलिवूडमधील आघाडींच्या अभिनेत्यांच्या यादीत असणाऱ्या सलमानने फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. एकदा तरी भाईजानसोबत काम करण्याची बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या प्रत्येक नवख्या कलाकाराची इच्छा असते. पण आत्ताचा हा दंबंग खान एकेकाळी लोकलने प्रवास करायचा आणि त्याने प्लॅटफॉर्मवर झोपून रात्र काढली हे फारसे पचनी पडण्यासारखे नाही. पण खरंच सलमानने आपल्या आयुष्यात हा अनुभव घेतला आहे. त्याबाबत काय म्हणाला सलमान जाणून घेऊयात.
जेव्हा सलमानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नव्हते तेव्हाची ही गोष्ट. सलमान आपल्या कॉलेजला जाण्यासाठी चर्चगेट लोकलने प्रवास करत असे. एके दिवशी दक्षिण मुंबईमध्ये राहणाऱ्या एका मित्राला भेटून घरी परतत असताना, त्याची शेवटची लोकल चुकली. अशावेळी काय करायचे तर त्यावेळी काय करायचे असा प्रश्न सलमानला पडल होता. त्यावेळी सलमान चक्क प्लॅटफॉर्मवरच रात्रभर थांबला. पहाटे जेव्हा पहिली विरार लोकल आली त्यावेळी सलमान घरी जाण्यासाठी त्या लोकलमध्ये चढला खरा. पण प्लॅटफॉर्मवर बसून रात्र काढल्यामुळे थकलेला सलमान ट्रेनमध्ये झोपून गेला आणि थेट विरारला पोहोचला. सलमानला जाग आली त्यावेळी तो विरारला पोहोचला होता. आता काही करणे हातात नव्हते त्यामुळे त्याच ट्रेनमध्ये बसून पुन्हा घरी येण्याचा विचार सलमानने केला. परंतु डोळ्यावरची झोप उडाली नसल्यामुळे सलमानला ट्रेनमध्ये पुन्हा झोप लागली आणि घरी ज्याण्याऐवजी तो पुन्हा चर्चगेट स्टेशनवर पोहोचला. त्यावेळी घरी जाण्याऐवजी त्याने थेट कॉलेज गाठून सकाळचे लेक्चर अटेंड केले आणि त्यानंतर घरी गेला.