FIFA FOOTBALL World Cup 2018: फ्रान्सला ' पेरु ' गोड; विजयासह अव्वल स्थानावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2018 22:26 IST2018-06-21T22:26:11+5:302018-06-21T22:26:11+5:30
किलियन एमबापे फटकावलेल्या एकमेव गोलच्या जोरावर फ्रान्सने पेरु संघावर 1-0 असा विजय मिळवला.

FIFA FOOTBALL World Cup 2018: फ्रान्सला ' पेरु ' गोड; विजयासह अव्वल स्थानावर
ठळक मुद्देया विजयासह फ्रान्सने ' क ' गटामध्ये सहा गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे.
मॉस्को : किलियन एमबापे फटकावलेल्या एकमेव गोलच्या जोरावर फ्रान्सने पेरु संघावर 1-0 असा विजय मिळवला. या विजयासह फ्रान्सने ' क ' गटामध्ये सहा गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे.
19 years and 183 days. pic.twitter.com/EtUNmqHOeQ
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) June 21, 2018
किलियन एमबापे फ्रान्ससाठी विश्वचषकात गोल करणार सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. पेरु संघाविरुद्धच्या सामन्यातील पहिल्या सत्रात एमबापेने गोल केला. सामन्याच्या 34व्या मिनिटाला एमबापेने सहजपणे गोल केला, त्यामुळे पहिल्या सत्रात फ्रान्सला 1-0 अशी आघाडी मिळवता आली.
Here are all the stats from the first half...#FRAPERpic.twitter.com/pnz2etC2ci
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) June 21, 2018