FIFA World Cup 2018: 'स्वीट'डन; स्वीडनचा कोरियावर विजय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 19:40 IST2018-06-18T19:38:48+5:302018-06-18T19:40:06+5:30
द्रेस ग्रँनक्विस्टने स्पॉट किकवर केलेल्या गोलच्या जोरावर स्टीडनने दक्षिण कोरियावर 1-0 असा विजय मिळवला.

FIFA World Cup 2018: 'स्वीट'डन; स्वीडनचा कोरियावर विजय
निझनी नोव्होगोरोड : आंद्रेस ग्रँनक्विस्टने स्पॉट किकवर केलेल्या गोलच्या जोरावर स्टीडनने दक्षिण कोरियावर 1-0 असा विजय मिळवला. विश्वचषकातील पहिल्याच लढतीत विजय मिळवत स्वीडनने आपला मोहिमेचा शुभारंभ केला आहे.
स्वीडन आणि कोरिया यांच्यातील पहिले सत्र निरसवाणे झाले. पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्याच्या संधी मिळाल्या, पण त्यामध्ये त्यांना यश आले नाही. पण दुसऱ्या सत्रात ग्रँनक्विस्टला 65व्या मिनिटाला स्पॉट किक मिळाली आणि त्याने या संधीचे सोने केले. ग्रँनक्विस्टच्या गोलच्या जोरावरच स्वीडनला हा विजय साकारता आला.
FT // #SWE win!
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) June 18, 2018
They join #MEX on three points in Group F after today's result against #KOR#WorldCuppic.twitter.com/K4EQFaRY7F
स्वीडनने संपूर्ण सामन्यात पाच वेळा कोरियाच्या गोलपोस्टवर आक्रमण केले. पण कोरियाला एकदाही स्वीडनच्या गोलपोस्टवर हल्ला करता आला नाही.