FIFA World Cup 2018: स्वित्झर्लंडनं सर्बियाचा 2-1नं केला पराभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 01:51 IST2018-06-23T01:36:07+5:302018-06-23T01:51:38+5:30
स्वित्झर्लंडनं अटीतटीच्या लढतीत सर्बियावर 2-1नं विजय मिळवला आहे.

FIFA World Cup 2018: स्वित्झर्लंडनं सर्बियाचा 2-1नं केला पराभव
कॅलिनइनग्रा : शाकिरीने ९० व्या मिनिटाला नोंदवलेल्या गोलच्या जोरावर स्वित्झर्लंडने शुक्रवार खेळल्या गेलेल्या लढतीत सर्बियाचा २-१ ने पराभव केला. याआधी सुरुवातीला सर्बियाच्या अॅलेक्झँडर मिटरोव्हिकने (५ वा मिनिट) गोल नोंदवित संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली होती. मिटरोव्हिकने सर्बियातर्फे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे योगदान दिले आहे. त्याने संघातर्फे १३ गोल नोंदवले आहेत तर दोन गोल नोंदवण्यात त्याने सहका-यांना साथ दिली आहे. सर्बियाने यापूर्वी कोस्टारिकाविरुद्ध त्यांनी १-० ने विजय नोंदवला आहे. मध्यंतरानंतर स्वित्झर्लंडने आक्रमक खेळ केला. गॅ्रनिट झाकाने ५३ व्या मिनिटाला चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखवित संघाला बरोबरी साधून दिली होती. निर्धारित वेळेत अखेरच्या मिनिटाला शाकिरीने गोल नोंदवित स्वित्झर्लंडला विजय मिळवून दिला. इंज्युरी टाईममध्ये सर्बियाने बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला, पण स्वित्झर्लंडच्या बचावपटूंनी त्यांचे प्रयत्न हाणून पाडले.