FIFA World Cup 2018: सुआरेझच्या गोलसह उरुग्वेने रचला इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 22:29 IST2018-06-20T22:29:48+5:302018-06-20T22:29:48+5:30
लुईस सुआरेझने केलेल्या आपल्या शंभराव्या सामन्यातील गोलच्या जोरावर उरुग्वेने इतिहास रचला आहे.

FIFA World Cup 2018: सुआरेझच्या गोलसह उरुग्वेने रचला इतिहास
मॉस्को : लुईस सुआरेझने केलेल्या आपल्या शंभराव्या सामन्यातील गोलच्या जोरावर उरुग्वेने इतिहास रचला आहे. या गोलच्या जोरावर उरुग्वेने सौदी अरेबियावर 1-0 असा विजय मिळवत बाद फेरीत प्रवेश केला आहे. त्याचबरोबर फुटबॉल विश्वचषकात 1954 सालानंतर पहिल्यांदाच उरुग्वेच्या संघाने सलग दोन विजय मिळवण्याचा इतिहास रचला आहे.
सुआरेझने सामन्याच्या 23 मिनिटाला गोल लगावला आणि स्टेडियममध्ये साऱ्यांच्याच आनंदाला उधाण आले. सुआरेझनेही आपल्या खास पद्धतीने हा आनंद साजरा केला. त्यानंतर पहिल्या सत्रात दोन्ही संघांना एकही गोल करता आले नाहीत.
Luis Suarez - the first player to score at three different editions of the #WorldCup for @Uruguay! pic.twitter.com/B2xfSuZd47
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) June 20, 2018
दुसऱ्या सत्रात सौदीच्या संघाने जोरदार आक्रमण लगावले, पण त्यांना यश मिळाले नाही. उरुग्वेच्या संघानेही चांगल्या चाली केल्या, पण त्यांना संधीचे सोने करता आले नाही.