जातीचे प्रमाणपत्र ढिवर समाजासाठी ठरतेय अडसर

By admin | Published: October 28, 2015 01:36 AM2015-10-28T01:36:19+5:302015-10-28T01:36:19+5:30

एनटी प्रवर्गात अनेक जातींचा समावेश होत असून राज्य सरकारच्या अखत्यारीत ढिवर समाज विमुक्त भटक्या जमातीत मोडतो ...

Caste certificate fixes the fix for the society | जातीचे प्रमाणपत्र ढिवर समाजासाठी ठरतेय अडसर

जातीचे प्रमाणपत्र ढिवर समाजासाठी ठरतेय अडसर

Next

वैरागडात कार्यक्रम : चंद्रलाल मेश्राम यांचे प्रतिपादन
वैरागड : एनटी प्रवर्गात अनेक जातींचा समावेश होत असून राज्य सरकारच्या अखत्यारीत ढिवर समाज विमुक्त भटक्या जमातीत मोडतो तर केंद्र सरकारच्या जातनिहाय तालिकेत इतर मागास प्रवर्गात ढिवर व कहार जातीचा समावेश होतो. त्यामुळे ढिवर समाजाला शासकीय नोकऱ्यांचा लाभ घेण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र पात्र करणे अडचणीचे ठरत आहे, असे प्रतिपादन माजी न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम यांनी केले.
ढिवर, कहार समाज संघटना वैरागडच्या वतीने वैरागड येथे मंगळवारी आयोजित महर्षी वाल्मिक ऋषी जयंती कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आ. आनंदराव गेडाम होते. मंचावर बाबुराव बावणे, शालिक धनकर, रामचंद्र तावेडे, केशव गेडाम, भास्कर बोडणे, एम. के. कुडवे, भारत बावनथडे, सुभाष सपाटे, दत्त सोमनकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक गजानन धनकर, संचालन सावजी धनकर यांनी तर आभार महादेव दुमाने यांनी मानले. (वार्ताहर)

Web Title: Caste certificate fixes the fix for the society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.