शहरातील फायबर मुताऱ्या गायब

By admin | Published: November 19, 2014 10:40 PM2014-11-19T22:40:14+5:302014-11-19T22:40:14+5:30

गडचिरोली शहराची लोकसंख्या ४५ हजाराच्या वर आहे. मात्र या शहरात सार्वजनिक मुताऱ्यांची अत्यंत कमतरता आहे. त्यामुळे नगर पालिकेने शहराच्या काही मुख्य भागात फायबर मुताऱ्या लावण्याचा निर्णय घेतला होता.

City fiber piles missing | शहरातील फायबर मुताऱ्या गायब

शहरातील फायबर मुताऱ्या गायब

Next

गडचिरोली : गडचिरोली शहराची लोकसंख्या ४५ हजाराच्या वर आहे. मात्र या शहरात सार्वजनिक मुताऱ्यांची अत्यंत कमतरता आहे. त्यामुळे नगर पालिकेने शहराच्या काही मुख्य भागात फायबर मुताऱ्या लावण्याचा निर्णय घेतला होता. दोन-तीन वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या या फायबर मुताऱ्या आता गायब झाल्या आहेत. त्यामुळे सर्वाधिक कुचंबना महिलांची होत आहे. या महत्वाच्या प्रश्नाकडे स्थानिक पालिका प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे.
गडचिरोली शहरात ६ प्रभाग व २३ वॉर्ड आहेत. कॉम्प्लेक्स पासून लांजेडा पर्यंत पसरलेल्या या शहराची लोकसंख्या ४५ हजाराच्या वर आहे. या शहरात सार्वजनिक शौचालय व मुताऱ्या काही वॉर्डातच आहे. मात्र शहराच्या गर्दीच्या भागात एकाही ठिकाणी सार्वजनिक मुतारी नाही. त्यामुळे नागरिकांना लघुशंकेसाठी उघड्या जागांवरच जावे लागते. यामध्ये महिलांची मोठी कुचंबना होते. बसस्थानकावर सार्वजनिक शौचालय व मुतारीची व्यवस्था आहे. इंदिरा गांधी चौकामध्ये दोन ठिकाणी पक्क्या स्वरूपाच्या सार्वजनिक मुताऱ्या आहेत. शहरातील गुजरी बाजारात तसेच आठवडी बाजारात पक्क्या मुताऱ्या आहेत. या पलिकडे सार्वजनिक मुताऱ्या अन्यत्र कुठेही नाही. ही बाब लक्षात घेऊन काँग्रेसच्या तत्कालिन नगराध्यक्षांनी शहरात ५ते ७ ठिकाणी फायबर मूत्रिघरांची व्यवस्था केली होती. व त्यांना महत्वाच्या मार्गांवर लावूनही दिले होते. याचा वापर नागरिकांकडून वाढला होता. कालांतराने पालिकेचे दुर्लक्ष झाल्याने फायबर मुताऱ्या कोसळून तुटल्या. पालिका प्रशासनाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. वर्षभराच्या आतच या मुताऱ्या जमिनदोस्त झाल्याने पुन्हा नव्याने त्या उभारण्याचे काम झाले नाही. सध्या देशभर स्वच्छता अभियान राबविले जात आहे. सार्वजनिक स्वच्छतेवर मोठा भर दिल्या जात आहे. या पार्श्वभूमिवर सार्वजनिक ठिकाणी मुताऱ्यांची व्यवस्था असणे, आता अनिवार्य आहे. गडचिरोली नगर पालिकेचे या दृष्टीने कोणतेही नियोजन नाही. शहरात बाहेरगावावरून येणाऱ्या महिलांना लघुशंकेसाठी जाण्याकरिता फार त्रास सहन करावा लागत आहे. शहरात आडोशांच्या जागांचीही कमतरता आहे. गडचिरोली नगर पालिकेने चामोर्शी मार्गावरील बसस्थानक , आयटीआय चौक, विश्राम भवन, कॉम्प्लेक्स परिसर, पोटेगाव मार्ग आदी भागात या मुताऱ्यांची व्यवस्था नव्याने करणे आवश्यक आहे. नुसत्या मुताऱ्या उभारून चालणार नाही, तर त्याच्या स्वच्छतेकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: City fiber piles missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.