गडचिरोलीतील वॉल पेंटिंग स्पर्धा पुढे ढकलली
By Admin | Published: October 2, 2016 02:16 AM2016-10-02T02:16:11+5:302016-10-02T02:16:11+5:30
लोकमत बाल विकास मंच व गडचिरोली पोलीस ठाण्याच्या वतीने २ आॅक्टोबर २०१६ रोजी
गडचिरोली : लोकमत बाल विकास मंच व गडचिरोली पोलीस ठाण्याच्या वतीने २ आॅक्टोबर २०१६ रोजी सकाळी १० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून इंदिरा गांधी चौकातील पोलीस ठाण्याच्या संरक्षक भिंतीवर वॉल पेंटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र काही अपरिहार्य कारणास्तव सदर वाल पेटींग स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे.
सामाजिक, पर्यावरण आदीसह विद्यार्थ्यांना योग्य वाटणाऱ्या कोणत्याही विषयावर या स्पर्धेत चित्र रेखाटता येणार आहे. सदर स्पर्धा दोन गटात घेतली जाणार आहे. सदर स्पर्धा सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. स्पर्धकांनी ब्रश व पेंट स्वत: घेऊन यावे. विजेत्यांना बक्षीस व प्रमाणपत्र तसेच स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना बाल विकास मंचतर्फे प्रमाणपत्र देऊन गौरविले जाणार आहे.
सदर वाल पेटींग स्पर्धची तारीख काही दिवसानंतर जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती बाल विकास मंचच्या जिल्हा संयोजिका किरण राजेश पवार (८००७१०९३१०), गडचिरोलीचे पोलीस निरिक्षक विजय पुराणिक यांनी दिली आहे. इच्छुक स्पर्धकांनी याची नोंद घ्यावी, असे कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)