शिबिरातून महिलांना कायद्यांविषयी दिली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 01:41 AM2018-03-10T01:41:16+5:302018-03-10T01:41:16+5:30

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त न्याय सेवा सदन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली येथे कायदेविषयक शिक्षण शिबिर घेण्यात आले.

Information about women from the camp was informed | शिबिरातून महिलांना कायद्यांविषयी दिली माहिती

शिबिरातून महिलांना कायद्यांविषयी दिली माहिती

googlenewsNext
ठळक मुद्देसेवा सदनात कार्यक्रम : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचा उपक्रम

ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त न्याय सेवा सदन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली येथे कायदेविषयक शिक्षण शिबिर घेण्यात आले.
या शिबिरात प्रज्ञा संजय मेहरे, वैशाली उदय पदवाड, वैशाली सूर, पाटील, घरोटे, अ‍ॅड. पल्लवी केदार यांनी महिलांचे अधिकार, जबाबदारी व कर्तृत्व याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला प्रमुख जिल्हा सत्र व न्यायाधीश तथा जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे अध्यक्ष संजय मेहरे, दिवाणी न्यायाधीश बी.एम. पाटील, धनराज काळे, विधी स्वयंसेवक वर्षा मनवर यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. संचालन मीनाक्षी मारलीवार तर आभार कविता वासनिक यांनी मानले.
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूतीपूर्व लिंगनिदान प्रतिबंधक कायदा याविषयावर कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे धनराज काळे, जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे शेखर सिंह यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या कर्मचाºयांनी सहकार्य केले.

Web Title: Information about women from the camp was informed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.