कुरखेडातील रस्त्यांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 11:58 PM2017-10-22T23:58:16+5:302017-10-22T23:58:38+5:30

शहराच्या बाजारपेठेतून तहसील कार्यालयाकडे जाणाºया रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. बाजारपेठेतच खाटीक मार्केटजवळ मोठा खड्डा पडला आहे.

Kurkhed road displacement | कुरखेडातील रस्त्यांची दुरवस्था

कुरखेडातील रस्त्यांची दुरवस्था

Next
ठळक मुद्देखड्ड्यामुळे वाहनधारक त्रस्त : वर्षभर साचून राहते नळाचे सांडपाणी

.लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : शहराच्या बाजारपेठेतून तहसील कार्यालयाकडे जाणाºया रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. बाजारपेठेतच खाटीक मार्केटजवळ मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यामध्ये पाणी साचून राहत असल्याने या मार्गावरून ये-जा करणाºया नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
खड्ड्याच्या बाजूला सार्वजनिक हातपंप आहे. या हातपंपाचे पाणी या ठिकाणी जमा होते. त्यामुळे वर्षभर सदर खड्ड्यात पाणी जमा होऊन राहते. वाहनचालकांना या खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने एकदम वाहन खड्ड्यात पडून अंगावर पाणी उसळते. त्यामुळे प्रवाशी कमालीचे त्रस्त आहेत.
पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते. या मार्गावर तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस स्टेशन, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व अन्य शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे या मार्गावरून नेहमीच वर्दळ राहते. याच मार्गावरून आमदार, खासदार व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आवागमन करतात. त्यांनाही या खड्ड्याचा व रस्त्याचा त्रास सहन करावा लागतो. मात्र कुणीच याकडे लक्ष देत नसल्याने रस्त्याची दुरवस्था कायम आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाची दुरूस्ती करावी, अशी मागणी कुरखेडा येथील नागरिकांकडून होत आहे.

Web Title: Kurkhed road displacement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.