गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केली पोलीस पाटलाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 06:38 PM2018-10-31T18:38:06+5:302018-10-31T18:38:28+5:30

पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी एटापल्ली तालुक्यातील नरानूर येथील पोलीस पाटलाची गोळी झाडून हत्या केली

Naxals Murder Police Patil in Gadciroli | गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केली पोलीस पाटलाची हत्या

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केली पोलीस पाटलाची हत्या

googlenewsNext

 गडचिरोली - पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी एटापल्ली तालुक्यातील नरानूर येथील पोलीस पाटलाची गोळी झाडून हत्या केल्याची घटना ३० आॅक्टोबर रोजी मंगळवारच्या रात्री घडली. मोद्दी गावडे (५०) असे हत्या झालेल्या पोलीस पाटलाचे नाव आहे. 

नक्षलवाद्यांनी पोलीस पाटील मोद्दी गावडे याला रात्री झोपेतून उठवून गावाबाहेर नेले. त्या ठिकाणी गोळी झाडून हत्या केली. यावेळी त्यांची पत्नी व दोन मुले घरी होती. मोद्दी यांच्या पत्नीने नक्षलवाद्यांना विरोध केला. सुरुवातीला गावाच्या बाहेर नेऊन मारझोड केली व त्यानंतर गोळी झाडली. हत्तेनंतर नक्षलवाद्यांनी घटनास्थळी चिठ्ठी टाकली व ते जंगलात निघून गेले. यात मोद्दी गावडे हा पोलीस खबºया असल्याचा उल्लेख आहे. मोद्दी गावडे हा २०१२ पासून पोलीस पाटील पदावर होता. तो पोलीस खबऱ्या असून या चिठ्ठीत उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांच्या नावांचा उल्लेख आहे. चिठ्ठीमध्ये कसनूसर एरिया कमिटी भाकपा (माओवादी) असे लिहून ठेवण्यात आले आहे. नरानूर येथील नक्षल हत्येची ही पहिलीच घटना असून या परिसरात नक्षलवाद्यांची दहशत पसरली आहे.

Web Title: Naxals Murder Police Patil in Gadciroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.