संपाच्या निर्णयावर संघटना ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 11:13 PM2018-08-06T23:13:11+5:302018-08-06T23:13:31+5:30

विविध मागण्यांसाठी ७ ते ९ आॅगस्ट या कालावधीत संपावर जाण्याचा निर्णय कर्मचारी संघटनांनी घेतला होता. शासनासोबतची बोलणी फिस्कटल्याने सदर संप करण्याचा ठाम निर्णय कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

The organization is firm on the decision of the strike | संपाच्या निर्णयावर संघटना ठाम

संपाच्या निर्णयावर संघटना ठाम

Next
ठळक मुद्देशासकीय कामकाज होणार ठप्प : ७ ते ९ आॅगस्ट दरम्यान काम बंद आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विविध मागण्यांसाठी ७ ते ९ आॅगस्ट या कालावधीत संपावर जाण्याचा निर्णय कर्मचारी संघटनांनी घेतला होता. शासनासोबतची बोलणी फिस्कटल्याने सदर संप करण्याचा ठाम निर्णय कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
अपवाद वगळता सर्वच कर्मचाºयांच्या संघटनांनी संपाला पाठींबा दर्शविला आहे. गडचिरोली समन्वय समितीच्या पदाधिकारी मंडळाची सभा सोमवारी पार पडली. या सभेत मंगळवारपासून तीन दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील १९ लाख कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. मंगळवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारच्या कर्मचारीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी जाहीर सभा आयोजित केले आहे. या सभेला सर्व प्रवर्गाच्या कर्मचाºयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संपाला पाठबळ द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, सरचिटणीस दुधराम रोहणकर, कार्याध्यक्ष राजकुमार पारधी, उपाध्यक्ष संजय खोकले, राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल चटगुलवार, सरचिटणीस भास्कर मेश्राम, संजय मैंद, चंदू प्रधान, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लतिफ पठाण, सचिव किशोर सोनटक्के यांच्यासह इतर कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी केले आहे.
शिक्षक परिषद, शिक्षक समिती व इतर शिक्षक संघटनांनीही संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मंगळवारपासून जिल्हा परिषदेच्या शाळासह अनुदानित शाळाही बंद राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: The organization is firm on the decision of the strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.