रूग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 01:19 AM2018-09-08T01:19:40+5:302018-09-08T01:20:10+5:30

जिल्ह्यातील गरोदर मातांना व बालकांना आरोग्याची उत्तम सेवा उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली येथे महिला व बाल रुग्णालय सुरू करण्यात आले. मोठा गाजावाजा करून रुग्णालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले.

Questionnaire on the management of the hospital | रूग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

रूग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Next
ठळक मुद्देविजय वडेट्टीवार यांनी घेतला आढावा : पाच महिन्यांत ५९ बालके दगावली

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील गरोदर मातांना व बालकांना आरोग्याची उत्तम सेवा उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली येथे महिला व बाल रुग्णालय सुरू करण्यात आले. मोठा गाजावाजा करून रुग्णालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले. मात्र या रुग्णालयात अवघ्या पाच महिन्यात ५९ बालकांचा व एका मातेचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब काँग्रेसचे विधीमंडळ उपगटनेते आ.विजय वडेट्टीवार यांच्या रुग्णालय भेटीप्रसंगी उघडकीस आली. या रुग्णालयात अनेक सुविधांचा अभाव असून डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. सदर मुद्दा आपण हिवाळी अधिवेशनात उचलून धरणार, असे संकेत आ.वडेट्टीवार यांनी दिले आहे.
आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील कुपोषण, माता व बाल मृत्यूचे प्रमाण आटोक्यात आणून आरोग्याची सेवा मिळावी, या हेतूने तत्कालीन पालकमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्या पुढाकाराने गडचिरोली शहरात १०० खाटांचे महिला रुग्णालय मंजूर करण्यात आले. या रुग्णालयात अत्याधुनिक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या रुग्णालयाचे उद्घाटन एप्रिल २०१८ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. रुग्णालयाचे लोकार्पण झाल्यापासून महिला रुग्णालयात महिला व बाल रुग्णांची गर्दी वाढू लागली. सर्वसुविधा असलेल्या या रुग्णालयात चांगली सेवा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना या रुग्णालयातील सेवेबाबत धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. महिला रुग्णालयातील असुविधांचा प्रश्न विधानसभेत मांडणार, असे आ.वडेट्टीवार यांनी सांगितले.

Web Title: Questionnaire on the management of the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.