मार्कंडेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 11:18 PM2017-11-11T23:18:06+5:302017-11-11T23:18:18+5:30
केंद्र व राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर जवळपास एक वर्षानंतर मार्र्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाला सुरूवात झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : केंद्र व राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर जवळपास एक वर्षानंतर मार्र्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाला सुरूवात झाली आहे.
चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडा येथे अतिशय पुरातन मंदिरे आहेत. यातील मुख्य मंदिराचा वरचा भाग क्षतिग्रस्त झाल्याने मंदिराच्या गाभाºयात पावसाचे पाणी जमा होत होते. त्यामुळे मंदिर कधीही कोसळण्याचा धोका निर्माण झाला असल्याने सदर मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात यावा, अशी मागणी होत होती. त्यानुसार पुरातत्व विभागाने जानेवारी २०१६ पासून मंदिरावरील दगड काढण्यास सुरूवात केली. सदर काम सहा महिने चालले. त्यानंतर मात्र या कामाकडे दुर्लक्ष झाले.
मार्र्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर यांनी दिल्ली येथे जाऊन गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या नेतृत्वात पुरातत्व विभागाच्या अधिकाºयांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर राज्य सरकारला निर्देश देण्यात आले. त्यानंतर मुंबई येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार डॉ. देवराव होळी यांच्यासह गजानन भांडेकर हे सुध्दा उपस्थित होते. या बैठकीनंतर मार्र्कंडेश्वर मंदिराच्या कामाला पुन्हा सुरूवात झाली. मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम सहा महिन्यात पूर्ण होईल, अशी माहिती पुरातत्व विभागाच्या अधिकाºयांनी दिली आहे. त्यानुसार नियोजन करून जीर्णोध्दाराच्या कामाची गती वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मार्र्कंडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गजानन भांडेकर यांनी काम बंद पडल्यापासून दर १५ दिवसांनी पुरातत्व विभागाचे अधिकारी यांच्याकडे वर्षभर पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, खासदार अशोेक नेते, आमदार डॉ. देवराव होळी यांनी मदत केली. त्यामुळे पुन्हा मार्र्कंडेश्वर मंदिराच्या कामाला सुरूवात झाली आहे.
महाशिवरात्रीनिमित्त मार्र्कंडादेव येथे जत्रा भरते. या जत्रेला देशभरातील हजारो भाविक येतात. त्यामुळे महाशिवरात्रीपूर्वी मंदिराचे काम अंतिम टप्प्याार्यंत पोहोचले असावे, अशी अपेक्षा भाविकांकडून व्यक्त केली जात आहे.