शिक्षकांचा धडक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 10:25 PM2017-11-04T22:25:16+5:302017-11-04T22:25:32+5:30
प्रमुख पाच मागण्यांसाठी महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक संघटनांची समन्वय समितीच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : प्रमुख पाच मागण्यांसाठी महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक संघटनांची समन्वय समितीच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
निवडश्रेणी व वेतनश्रेणी लागू करण्यासाठी २३ आॅक्टोबर २०१७ चा शासन निर्णय रद्द करावा, शिक्षकांना करावी लागणारी सर्व आॅनलाईन कामे बंद करावी, केंद्र पातळीवर डेटा आॅपरेटरची नेमणूक करावी, नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व प्राथमिक शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करावी, बदली इच्छुक असलेल्या सर्व शिक्षकांना बदली मिळालीच पाहिजे. परंतु कुणावरही अन्याय होऊ नये म्हणून २७ फेब्रुवारीच्या शासन निर्णयात सुधारणा कराव्या, मे २०१८ मध्ये बदल्या कराव्या आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व शिक्षक परिषद संघटनेचे खांडेकर, सुरेंद्र धकाते, भास्कर मडावी, रमेश बोरकर, राष्टÑवादी शिक्षक संघटनेचे विनोद ब्राह्मणवाडे, मुख्याध्यापक-शिक्षक समितीचे अनिल मुलकलवार, जुनी पेंशन हक्क संघटनेचे बापू मुनघाटे, अंकुश मैलारे, गणेश आखाडे, सुजीत दास, देशमुख, पदवीधर संघटनेचे जांभुळकर, शिक्षक संघाचे प्रमोद कावळकर, किशोर कोहळे, धवेश कुकडे, आशिष धात्रक, शिला सोमनकर, स्मृती कुडकावार, रघुनाथ भांडेकर, एकनाथ पिलारे, दोनाडकर, मंगला शेंडे, राजू चिलमवार, सुरेश वासलवार, भुजंगराव नारनवरे, अंगद बावनकुळे, गाजनन शेंद्र यांनी केले. मोर्चाला अपेक्षेपेक्षा अल्प प्रतिसाद मिळाला.