तंबाखू विरोधी दिन साजरा
By admin | Published: June 1, 2016 02:03 AM2016-06-01T02:03:28+5:302016-06-01T02:03:28+5:30
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्य जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने
न्यायाधीश उपस्थित : विधी सेवा प्राधिकरणाचा पुढाकार
गडचिरोली : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्य जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय गडचिरोली येथे मंगळवारी तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दुसरे दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) एस. एम. बोमिडवार हे होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय ठक्कर, जिल्हा दंत चिकित्सक डॉ. राजन यादव, पवन दारोकर, दिनेश खोरगडे आदी उपस्थित होते. तंबाखू सेवन व धूम्रपानामुळे समाजात कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी तंबाखू सेवनामुळे मानवी शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे, असे मार्गदर्शन उपस्थित समुपदेशकांनी केले.
दृकश्राव्य माध्यमांद्वारे तंबाखू व धुम्रपानाच्या दुष्परिणामांविषयी मार्गदर्शन तसेच समुपदेशन करण्यात आले. जिल्हा दंत चिकित्सक डॉ. राजन यादव यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. प्रवीण दारोकर यांनी धुम्रपान सोडल्यास होणारे फायदे उपस्थित कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. (जिल्हा प्रतिनिधी)