विनाअनुदानित शाळेतील शिक्षक रस्त्यावर
By admin | Published: September 29, 2016 01:38 AM2016-09-29T01:38:43+5:302016-09-29T01:38:43+5:30
मूल्यांकनात पात्र घोषित करण्यात आलेल्या मान्यता प्राप्त खासगी प्राथमिक व माध्यमिक विनाअनुदानित
१९ सप्टेंबरच्या जीआरचा केला निषेध : जाचक अटी रद्द करून अनुदान देण्याची मागणी
गडचिरोली : मूल्यांकनात पात्र घोषित करण्यात आलेल्या मान्यता प्राप्त खासगी प्राथमिक व माध्यमिक विनाअनुदानित शाळांना सरसकट २० टक्के अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र यासंदर्भात १९ सप्टेंबर २०१६ रोजी नवा शासन निर्णय काढून अनुदानासाठी जाचक अटी शाळांसाठी लादल्या. त्यामुळे जिल्ह्यातील विनाअनुदानित शाळांचे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी बुधवारी रस्त्यावर उतरून गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात सदर जाचक अटी असलेल्या जीआरचा निषेध केला.
त्यानंतर गडचिरोली जिल्हा कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. या निषेध आंदोलनाचे नेतृत्व विनाअनुदानित शाळा कृती समितीचे अध्यक्ष विलास बल्लमवार, सचिव नारायण धकाते यांनी केले.
यावेळी चंद्रशेखर उईके, नागोसे, प्रकाश देसाई, चंदनखेडे, बावणे, कवाडकर, बांगरे, मंगला उईके, सहारे, दिनेश कवाळकर, गुणवंत मारगाये, दशरथ मोहुर्ले, नंदकिशोर चंदनखेडे, देवाजी पेटकुले, अवथरे, मेश्राम, दाजगाये, खांडरे, भर्रे, फुलुके, मारकवार, तितीरमारे, दिलीप तातावार, राजेश ढुमणे, हरीश गेडाम, पी. ए. सरकार, जी. पी. उंदीरवाडे, बेरूगवार, पुल्लुरवार, पुलकुवर, विनायक वासेकर, सचिन चलकलवार, अभिजीत साना यांच्यासह बहुसंख्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी शिक्षकांनी राज्याचे मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, वित्तमंत्री यांच्या कार्यप्रणालीचा तीव्र शब्दात निषेध केला. त्यांच्या विरोधात नारेबाजीही केली. (स्थानिक प्रतिनिधी)