श्रीलंकेतून नारळ आयातीचा निर्णय गोव्याकडून मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 02:04 PM2018-02-06T14:04:25+5:302018-02-06T14:05:01+5:30

श्रीलंकेतून गोव्यात नारळाची आयात करण्यात येईल अशा प्रकारचा विचार कृषी मंत्री विजय सरदेसाई यांनी यापूर्वी जाहीरपणे मांडला तरी, अशा प्रकारे आयात करणे हे सरकारवर दोष येणारे ठरेल याची कल्पना लगेच सरकारला आली. यामुळे सरकारने प्रस्ताव आता गुंडाळला आहे.

Coconut imports from Sri Lanka are back from Goa | श्रीलंकेतून नारळ आयातीचा निर्णय गोव्याकडून मागे

श्रीलंकेतून नारळ आयातीचा निर्णय गोव्याकडून मागे

Next

पणजी : श्रीलंकेतून गोव्यात नारळाची आयात करण्यात येईल अशा प्रकारचा विचार कृषी मंत्री विजय सरदेसाई यांनी यापूर्वी जाहीरपणे मांडला तरी, अशा प्रकारे आयात करणे हे सरकारवर दोष येणारे ठरेल याची कल्पना लगेच सरकारला आली. यामुळे सरकारने प्रस्ताव आता गुंडाळला आहे.
गोव्यात नारळाचे दर प्रचंड वाढले आहेत. छोटे नारळ वीस रुपये दराने विकले जात आहेत. किंचित मोठे नारळ 25 रुपये तर एकदम मोठय़ा आकाराचे नारळ 35 ते 40 रुपये दराने विकले जात आहेत. नारळाचे दर प्रचंड वाढलेले असताना सरकार लोकांना दिलासा देण्यासाठी काहीच करत नाही अशी टीका करत काँग्रेसच्या महिला शाखेने अलिकडेच आंदोलन केले. आंदोलनावेळी महिला काँग्रेसने कमी दरात नारळ विक्री केली व ग्राहकांनी त्यास मोठा प्रतिसाद दिला. याच काळात कृषी मंत्री सरदेसाई यांनी गोव्यात नारळाचा तुटवडा असल्याने सरकार श्रीलंकेमधून नारळाची आयात करील असे विधान केले. त्यावर काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव गिरीश चोडणकर व इतरांनी टीका केली. नारळाच्या आयातीची गरज नाही, सरकारचा त्यामागिल हेतू गोव्यातील माडाच्या बागायती संपुष्टात आणून तेथील जमिनींचे सेटलमेन्ट झोनमध्ये रुपांतर करावे असा असावा असे चोडणकर यांनी म्हटले होते. त्यावर चोडणकर यांच्या मानसिकतेवर मंत्री सरदेसाई यांनी टीका करत प्रत्युत्तर दिले होते.
या सगळ्य़ा वादात सरकारने अनुदानित दराने राज्यातील काही दालनांमधून नारळ विक्री सुरू केली. गोवा फलोत्पादन विकास महामंडळाने पहिल्या टप्प्यात अवघ्याच दालनांमधून नारळ विक्री सुरू केली आहे. राज्यभरातील सर्व दालनांमधून नारळ विक्रीचा विस्तार करण्याचा गोवा फलोत्पादन विकास महामंडळाचा प्रस्ताव आहे. दालनांमधून कमी दराने नारळ विक्री करण्यासाठी मुळात जास्त संख्येने नारळ जलदगतीने उपलब्ध होणो गरजेचे आहे. एकूण एक लाख नारळ सरकारने तत्काळ विकत घ्यावे असा प्रयत्न महामंडळाने चालवला आहे. स्थानिक व अन्य ट्रेडर्सकडून गोवा बागायतदार संस्था व गोवा फलोत्पादन महामंडळ ही नारळ खरेदी करणार आहे.
दरम्यान, श्रीलंकेतून नारळाची आयात करण्याचा प्रस्ताव आम्ही मागे घेतल्याचे कृषी मंत्री सरदेसाई यांनी सांगितले. आयात करण्याचा विचार आम्ही प्रारंभी केला होता पण आता गरज वाटत नाही असे ते म्हणाले.

Web Title: Coconut imports from Sri Lanka are back from Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा