गोव्यात मासळीची आवक घटली, निर्यातीत मोठी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 07:30 PM2018-08-02T19:30:44+5:302018-08-02T19:31:31+5:30
गोव्यात चार वर्षात मासळीची आवक 1076 टनस नी घटल्याचे आढळून आले आहे. मात्र, निर्यातीत 34 हजार टन एवढी वाढ झाल्याचीमाहिती मच्छिमारमंत्री विनोद पालयेकर यांनी दिली. सन 2014 मध्ये 1.28 लक्ष टन मासळी गोव्यात पकडली जात होती.
पणजी : गोव्यात चार वर्षात मासळीची आवक 1076 टनस नी घटल्याचे आढळून आले आहे. मात्र, निर्यातीत 34 हजार टन एवढी वाढ झाल्याचीमाहिती मच्छिमारमंत्री विनोद पालयेकर यांनी दिली. सन 2014 मध्ये 1.28 लक्ष टन मासळी गोव्यात पकडली जात होती. त्यानंतर 2017 मध्ये ती 120.4 लक्ष टनापर्यंत खाली आली. 2015 मध्ये 1.08 टन तर पुढच्यावर्षी म्हणजेच 2016 मध्ये 1.01 लक्ष टनपर्यंत पोहोचली. 2017 मध्ये मासळीची आवक वाढून 1.20 टन एवढी झाली आहे. म्हणजेच 2017 मध्ये मासळीची आवक लक्षणीय प्रमाणापर्यंत वाढली आहे.
एकीकडे गोव्यात मासळी मिळण्याचे प्रमाण घटत असतानाच गोव्यातून होणारी माशांची निर्यात वाढली आहे. 2014 मध्ये 40365 टन एवढी मासळी निर्यात केली जात होती. त्या नंतरच्या वर्षात म्हणजे 2015 मध्ये निर्यात पुन्हा घटून ती 38 हजार टनांवर आली. परंतु, 2017 मध्ये निर्यात वाढल्याची माहिती मच्छिमार मंत्र्यांनी दिली. त्यावर्षी
गोव्याहून मासळीची निर्यात ही चीन, अमेरिका, व इतर देशात होती. गोव्यातील मासळी त्यासाठी पुरत नसल्यामुळे इतर राज्यातून मासळी घेऊन ती काही जण निर्यात करीत आहेत. मासळी साठवून ठेवण्याची गोव्यात 12 ठिकाणी केंद्रे आहेत. या केंद्राच्या माध्यमातूनच निर्यात केली जात आहे.