गोव्यात ३३६ शॅकना हंगामी परवाने, पहिले चार्टर विमान 3 ऑक्टोबरला येणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 01:28 PM2018-09-28T13:28:41+5:302018-09-28T13:29:13+5:30

पर्यटन खात्याने आगामी हंगामासाठी राज्यभरातील किना-यांवर ३३६ शॅकना हंगामी परवाने दिले आहेत.

Goa : the seasonal licenses for 336 shakes, first charter aircraft will arrive on October 3 | गोव्यात ३३६ शॅकना हंगामी परवाने, पहिले चार्टर विमान 3 ऑक्टोबरला येणार 

गोव्यात ३३६ शॅकना हंगामी परवाने, पहिले चार्टर विमान 3 ऑक्टोबरला येणार 

Next

पणजी : पर्यटन खात्याने आगामी हंगामासाठी राज्यभरातील किना-यांवर ३३६ शॅकना हंगामी परवाने दिले आहेत. रशियाचे पहिले चार्टर विमान येत्या 3 ऑक्टोबरला गोव्यात येणार असून त्या दिवसापासून ख-या अर्थाने राज्यातील पर्यटक हंगाम सुरु होणार आहे. पर्यटन खात्याचे संचालक मिनीन डिसोझा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ३३६ शॅकना हंगामी परवाने देण्यात आले असून जमीन आखणीही झालेली आहे. पूर्वीच्याच जागी शॅक येतील. २0१६ ते २0१९ या तीन वर्षांसाठी सरकारने शॅक धोरण तयार करुन त्यानुसार तीन वर्षांकरिता सीआरझेड परवाने दिले.

३४७ पैकी ३३६ शॅकना परवाने दिले त्यात २५0 शॅक उत्तर गोव्यात तर ८६ शॅक दक्षिण गोव्यात आहेत. आवश्यक ते सोपस्कार पूर्ण करण्यासाठी महिनाभराचा कालावधी देण्यात आला असून त्यानंतर अंतिम परवाने दिले जातील. दक्षिण गोव्यात कोलवा, बाणावली, वार्काण केळशी, वेळसांव, आरोसी, बेतालभाटी व झालोर या किना-यांवर तर उत्तर गोव्यात कळंगुट, कांदोळी, केरी, हरमल, मांद्रे, हणजुण, वागातोर, शिरदोण व शापोरा आदी किनाºयांवर शॅकना हंगामी परवाने देण्यात आले आहेत. 

किनाºयांवर उभारल्या जाणाºया शॅकचे देश विदेशी पर्यटकांना मोठे आकर्षण आहे. गोव्याच्या किना-यांना भेट देणारे पर्यटक एकदा तरी कुटुंबासमवेत शॅकना भेट देतात. वेगवेगळे स्थानिक, देशी तसेच कॉन्टीनेंटल खाद्यपदार्थ, मद्य शॅकमध्ये पुरविले जाते.  

५ हजार रुपये शुल्कवाढ 

शॅकमालक संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोझ म्हणाले की, यंदा सरकारने शुल्क ५ हजार रुपयांनी वाढविले आहे. ही वाढ धोरणानुसार असली तरी व्यावसायिकांना तशी परवडत नाही. १८ बाय ८ मिटर जागेसाठी गेल्यावर्षी ६0 हजार शुल्क पर्यटन खात्याने घेतले होते. यंदा ५ हजार रुपयांनी ते वाढविण्यात आले आहे. शॅकांमध्ये काचेच्या बाटल्या वापरु नये अशा सूचना गेल्या वर्षी खात्याने केल्या होत्या त्यावर कार्दोझ म्हणाले की, त्यावर पर्याय मिळायला हवा. शॅकमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, प्रसाधनगृहांची सोय करणे तसेच कचरा व्यवस्थापन आदी गोष्टींची पूर्तता शॅकमालक करतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

पहिले चार्टर विमान रशियाचे 

पर्यटन हंगामातील पहिले चार्टर विमान येत्या ३ आॅक्टोबर रोजी रशिया येथून येणार आहे. ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टूर असोसिएशन आॅफ गोवाचे अध्यक्ष सावियो मेसियश यांनी ही माहिती दिली. आगामी पर्यटन हंगामासाठी हॉटेल व्यावसायिक आशावादी असल्याचे ते म्हणाले. अजूनही खोल्यांचे आरक्षण तसे झालेले नाही. राज्यातील बडी तारांकित हॉटेल्स चार्टर विमानांमधून येणा-या पर्यटकांवरच अवलंबून आहे. 

पर्यटन खात्याकडून प्राप्त अधिकृत माहितीनुसार गेल्या वर्षी पर्यटक हंगामात ९८१ चार्टर विमाने आली आणि त्याव्दारे २ लाख ४७ हजार ३६५ विदेशी पर्यटकांनी भेट दिली. त्यात रशियन पर्यटकांचा भरणा जास्त होता. गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात रशियन पर्यटकांची संख्या वाढलेली आहे. 

Web Title: Goa : the seasonal licenses for 336 shakes, first charter aircraft will arrive on October 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा