लोकसभा निवडणूक: रत्नागिरीत नारायण राणेंच्या ‘रोड शो’मध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत!
By किशोर कुबल | Published: April 19, 2024 01:34 PM2024-04-19T13:34:25+5:302024-04-19T13:36:19+5:30
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे महाराष्ट्रात भाजपने प्रचारासाठी नेमलेल्या स्टार प्रचारकांपैकी एक आहेत
किशोर कुबल/ पणजी: भाजप उमेदवार नारायण राणे यांनी रत्नागिरीत दुपारी उमेदवारी अर्ज भरताना आयोजित केलेल्या ‘रोड शो’ मध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भाग घेतला. या ‘रोड शो’ मध्ये कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
केंद्रीय मंत्री नारायण राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर रिेंगणात आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे महाराष्ट्रात भाजपने प्रचारासाठी नेमलेल्या स्टार प्रचारकांपैकी एक आहेत.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा शिवसेनेचे (उबाठा) विनायक राऊत हे सध्या खासदार असून ते पुन्हा उमेदवार आहेत व राणे यांची थेट लढत राऊत यांच्याशीच आहे. राणे यांचे पुत्र नीलेश यांनी २००९ साली कॉग्रेसच्या तिकिटावर या मतदारसंघात विजय मिळवला होता. २०१४ साली नीलेश यांना काँग्रेसने पुन्हा उमेदवारी दिली, पण त्यांचा पराभव झाला. आता नारायण राणे भाजपच्या तिकिटावर रिंगणात आहेत.