म्हादई पाणी प्रश्न : लवादासमोर अंतरिम दिलासा मागण्याचा येडीयुरप्पांचा आग्रह, 6 फेब्रुवारीपासून अंतिम युक्तीवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 08:06 PM2017-12-23T20:06:10+5:302017-12-23T20:08:31+5:30
म्हादई पाणीतंटा प्रश्नी येत्या 6 फेब्रुवारीपासून पाणी तंटा लवादासमोर गोवा व कर्नाटकचे अंतिम युक्तीवाद सुरू होणार आहेत.
पणजी : म्हादई पाणीतंटा प्रश्नी येत्या 6 फेब्रुवारीपासून पाणी तंटा लवादासमोर गोवा व कर्नाटकचे अंतिम युक्तीवाद सुरू होणार आहेत. मात्र म्हादई पाणी वाटपाचा वाद सध्या या दोन्ही राज्यांमध्ये वेगळ्याच वळणावर पोहोचला आहे. भाजपाचे कर्नाटकमधील नेते येडीयुरप्पा यांनी कर्नाटक सरकारने आता गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आधारे लवादाकडे जाऊन पाणी वाटपाविषयी लवादाकडून अंतरिम दिलासा मागावा, अशी मागणी शनिवारी कर्नाटकमध्ये पत्रकारांशी बोलताना केली आहे.
कर्नाटक राज्यातील राजकीय नेते सध्या इरेला पेटले आहेत. गोव्यात येणा-या म्हादई नदीचे 7.5 टीएमसी पाणी आपण शक्य तेवढय़ा लवकर वापरण्यासाठी घ्यावे असे त्यांनी ठरवले आहे. लवादासमोर येत्या दि. 6 फेब्रुवारीला गोव्याच्यावतीने आत्माराम नाडकर्णी हे युक्तीवाद करणार आहेत. त्यांचे युक्तीवाद एक महिना चालतील. त्यानंतर कर्नाटकचे वकील युक्तीवाद करणार आहेत. लवादाचा निवाडा जून महिन्यात येण्याची शक्यता नाडकर्णी यांना वाटते. तथापि, कर्नाटकने सध्या गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या पत्रचे भांडवल चालवले आहे. येडीयुरप्पा यांनी तर शनिवारी कर्नाटकमध्ये सांगितले, की र्पीकर यांनी दिलेल्या पत्रविषयी आपण कायदेशीर सल्ला घेतला आहे. त्या पत्रच्या आधारे म्हादईचे पाणी कर्नाटकला मिळेल. गोवा सरकारचा विरोध नाही. कर्नाटक सरकारने आता त्या पत्रच्या आधारे लवादाकडे जावे व अंतरिम आदेश मागावा. पर्रीकर यांच्या पत्रच्या आधारे कर्नाटकला पाणीप्रश्नी लवादाकडून अंतरिम दिलासा मिळेल, असा कायदेशीर सल्ला आपल्याला मिळाला आहे.
काँग्रेस पक्षाने म्हादईप्रश्नी राजकारण करू नये, असे येडीयुरप्पा यांनी म्ह्टले असून गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष शांताराम नाईक यांच्यावर त्यांनी टीका केली आहे. पर्रीकर यांनी येडीयुरप्पा यांना पत्र लिहून पाणी वाटपाविषयी चर्चा करण्याची तयारी आहे असे कळविल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही र्पीकर यांना पत्र लिहिले व चर्चेसाठी तारीख ठरवावी अशी विनंती केली. मात्र त्याबाबत गोवा सरकारने काही भाष्य केलेले नाही. आपण कर्नाटकची विधानसभा निवडणूक झाल्यानंतरच कर्नाटकशी चर्चा करीन, असे र्पीकर यांनी यापूर्वी जाहीर केले आहे. मात्र त्याविषयी येडीयुरप्पा यांनी शनिवारी कोणतेच भाष्य केले नाही.
6 फेब्रुवारीला लवादासमोर अंतिम युक्तीवाद सुरू होतील. अगोदर माङो युक्तीवाद असतील. मग कर्नाटकचे होतील. कर्नाटकने एक महिना युक्तीवाद केल्यानंतर पुन्हा मला बाजू मांडता येईल व जून किंवा जुलैमध्ये लवादाचा निवाडा येईल असे मला व्यक्तीश: वाटते. - आत्माराम नाडकर्णी, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल