मुंबई मटका किंग गोव्यात अटकेत, मटका बाजार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:52 AM2018-08-11T00:52:25+5:302018-08-11T00:52:32+5:30
मुंबई मटका बाजार चालविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश गोव्याच्या सीआयडी गुन्हे शाखेने केला असून याप्रकरणी मुंबईचा मटका किंग प्रकाश सावला यांच्यासह 29 जणांना रात्री उशिरा अटक केली आहे.
पणजी : मुंबई मटका बाजार चालविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश गोव्याच्या सीआयडी गुन्हे शाखेने केला असून याप्रकरणी मुंबईचा मटका किंग प्रकाश सावला यांच्यासह 29 जणांना रात्री उशिरा अटक केली आहे.
गोवा क्राईम ब्रँच पोलीस अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी दिलेल्या माहितीनुसार जयेश शहा व छोटूलाल लालन हे या टोळीचे गोव्यात सूत्रधार होते. त्यांच्याविरुद्ध मुंबईत अनेक गुन्हे नोंद आहेत या धाडीनंतर मुंबई मटका बाजाराचा अंक शुक्रवारी रात्री जाहीर होऊ शकलेला नाही. गोवा सीआयडी क्राईम ब्रांचच्या इतिहासातील मटका बंद ची ही पहिलीच मोठी धाड आहे. या 29 जणांविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायदा तसेच माहिती तंत्रज्ञान गुन्हेगारी संगनमत प्रतिबंधक कायदा या खाली कारवाई करण्यात आली आहे. गोव्यातील मटका एजंट आहे या संबंधातल्या चा संशय आहे सर्व 29 जून परप्रांतीय असून यात बहुतांश महाराष्ट्रातील आहेत. मुख्य संशयित प्रकाश सावला याला मोक्का कायद्याखाली अटक करण्यात आली आहे. त्याला आधी खून तसेच इतर गुन्ह्यांमध्ये अटक झालेली आहे. संगणक; मोबाईल फोन्स जप्त करण्यात आले आहे. मोबाईलवरून मटका बीट घेतली जात असे. मुंबई मटका बाजार गोव्यात चालवला जातो ही घटना गोमंतकीयांसाठी अत्यंत धक्कादायक ठरली आहे. मुंबई मटका बाजार कोटय़वधी रुपयांची उलाढाल होत असते गोव्यातही मोठ्या प्रमाणात मटका उलाढाल होते या धाडीनंतर इंटरनेटवरही मुंबई मटक्याचा बाबतीत 'आज बंद आहे नही आयेगी' मेसेज गोव्यात परप्रांतीय घेऊन अशा पद्धतीने गैरव्यवहार चालविले आहेत याचा प्रत्यय गोव्याच्या सीआयडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या वरील कारवाईनंतर आला.