गोव्यात संगीत महोत्सवांना अमली पदार्थांचा विळखा; कायदेशीर कारवाईला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 03:14 AM2017-09-03T03:14:33+5:302017-09-03T03:15:15+5:30

अमली पदार्थांच्या विरोधातील कारवाईचा पोलिसांनी कितीही आव आणला असला, तरी मोठे मासे पोलिसांच्या हातात लागलेले नाहीत. पोलिसांपेक्षा अमली पदार्थांचे नेटवर्क प्रचंड संघटित असल्याचे पोलिसांनीच जाहीरपणे मान्य केलेले आहे.

Organize musical festivals in Goa; The speed at the legal proceedings | गोव्यात संगीत महोत्सवांना अमली पदार्थांचा विळखा; कायदेशीर कारवाईला वेग

गोव्यात संगीत महोत्सवांना अमली पदार्थांचा विळखा; कायदेशीर कारवाईला वेग

Next

- सद्गुरू पाटील।

पणजी : अमली पदार्थांच्या विरोधातील कारवाईचा पोलिसांनी कितीही आव आणला असला, तरी मोठे मासे पोलिसांच्या हातात लागलेले नाहीत. पोलिसांपेक्षा अमली पदार्थांचे नेटवर्क प्रचंड संघटित असल्याचे पोलिसांनीच जाहीरपणे मान्य केलेले आहे. गोव्याच्या किनारपट्टीवरील संगीत महोत्सवांना अमली पदार्थांच्या नशेने घट्ट विळखा घातला आहे. गोवा सरकारच्या पर्यटन आणि पोलीस खात्याने हा विषय प्रथमच खूप गंभीरपणे घेतला आहे.
उत्तर गोव्यातील शिवोली, कळंगुट, मांद्रे या मतदार संघांमधील किनारपट्टीच्या भागात अमली पदार्थांचा व्यापार चालू नये, अशी स्पष्ट भूमिका जलसंसाधनमंत्री विनोद पालयेकर, आमदार मायकल लोबो व पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी घेतली. अमली पदार्थ व्यावसायिकांशी पोलिसांचे साटेलोटे असते व त्यामुळेच हा व्यवसाय फोफावला, अशी टीका मंत्री आजगावकर व पालयेकर, कृषिमंत्री विजय सरदेसाई व आमदार लोबो यांनी केली आहे. गृहखाते सांभाळणारे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या प्रकारांची दखल घेतली व पोलीस यंत्रणा सक्रीय केली. परिणामी, १५ दिवसांत पोलिसांनी किनारपट्टीत २७ छापे टाकून एक कोटीपेक्षा अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त केले. २७ जणांना अटक झाली आहे.

15
कोटींची बाकी
सनबर्नचे आयोजन दरवर्षी गोव्यात केले जाते. यंदा डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये महोत्सव होईल. सनबर्न व सुपरसोनिक हे दोन इलेक्ट्रॉनिक नृत्य महोत्सव दरवर्षी किनारपट्टीत आयोजित केले जातात. आयोजकांकडून गोवा सरकारला एकूण ९.६७ कोटी रुपये येणे आहे. ६.२९ कोटी रुपयांचा मनोरंजन कर व अन्य शुल्क एका सुपरसोनिकच्या आयोजकांकडून येणे आहे, असे सरकारी यंत्रणेचे म्हणणे आहे.

दोघा पर्यटकांचा मृत्यू
उत्तर गोव्यातील हणजूण येथे संगीत रजनी वेळी अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे दोघा पर्यटकांचा मृत्यू झाला.

गोव्यातील संगीत रजनीमध्ये अमली पदार्थांचा वापर होणार नाही, याची काळजी पोलीस घेत आहेत. सरकारने पोलिसांना सक्रिय केले आहे. आम्हाला चांगले संगीत महोत्सव झालेले हवे आहेत.
- बाबू आजगावकर,
पर्यटनमंत्री, गोवा

Web Title: Organize musical festivals in Goa; The speed at the legal proceedings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.