इफ्फी केवळ 25 दिवसांवर, मराठी-कोंकणी सिनेमांचे पॅकेज
By admin | Published: October 26, 2016 08:15 PM2016-10-26T20:15:16+5:302016-10-26T20:15:16+5:30
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आता केवळ पंचवीस दिवसांवर येऊन ठेपला आहे. यावेळी महोत्सव अधिक वैशिष्टय़पूर्ण व सर्वसमावेशक असेल
Next
>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 26 - भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आता केवळ पंचवीस दिवसांवर येऊन ठेपला आहे. यावेळी महोत्सव अधिक वैशिष्टय़पूर्ण व सर्वसमावेशक असेल. जे लोक इफ्फीचे प्रतिनिधी नसतील त्यांच्यासाठी उत्कृष्ट मराठी व कोंकणी चित्रपट दाखविले जातील. अशा एकूण वीस सिनेमांचे पॅकेज असेल, असे गोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमेय अभ्यंकर यांनी बुधवारी सांगितले.
मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांच्यासोबत अभ्यंकर यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. बारा ते तेरा कोटी रुपयांचा खर्च इफ्फीच्या आयोजनावर होईल. वीस ते पंचवीस टक्के म्हणजे तीन कोटी रुपयांचा निधी हा पुरस्कत्र्या कंपन्यांकडून उभा केला जाईल, असे अभ्यंकर यांनी सांगितले. दक्षिण कोरिया यंदा इफ्फीसाठी फोकस कंट्री आहे. बार्को कंपनीकडून इफ्फीसाठी प्रोजेक्टर्स पुरस्कृत केले जाणार आहेत. त्यामुळे ईएसजीचा 7क् ते 8क् लाखांचा खर्च वाचेल. इफ्फीच्या सर्व निविदा प्रक्रिया ह्या अतिशय पारदर्शक आहेत. आम्हाला काहीच लपवायचे नाही, कारण आम्ही काहीच गैर केलेले नाही, असे अभ्यंकर यांनी सांगितले.
इफ्फीसाठी यंदा कला दिग्दर्शक नसेल. इवेन्ट व्यवस्थापनासाठी ईएसजीला निविदा जारी करण्यास केंद्र सरकारने सांगितले होते, त्यानुसार आम्ही काम पार पाडले. युनेस्कोशी आम्ही टायअप केले आहे. दृष्टीहीन प्रेक्षकांसाठी युनेस्कोकडून चित्रपट दाखविले जातील. एफटीआयकडून एकूण तीन कृतीसत्रे आयोजित केली जातील. अभिनय, फिल्म एप्रिसिएशन आदी विषयांवरील या कार्यशाळा असतील. बालोद्यानात मुलांसाठी काही सिनेमा दाखविले जातील. जे लोक प्रतिनिधी होत नाहीत, त्यांच्यासाठी पर्वरी व मडगावमधील आयनॉक्समध्ये इफ्फीचे सिनेमा दाखविण्याचा आमचा प्रयत्न असेल. आतार्पयत इफ्फीसाठी एकूण साडेचार हजार प्रतिनिधींची नोंदणी झाली आहे. गेल्यावर्षी साडेसात हजार प्रतिनिधी होते. यंदा त्यापेक्षा हजार ते दीड हजार प्रतिनिधी जास्त असतील, असे अभ्यंकर यांनी सांगितले.
इफ्फी पुढील तीन ते चार वर्षात आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी बनू शकतो. यावेळीही अतिशय चांगले सिनेमा इफ्फीत प्रदर्शित होतील. इफ्फीचे प्रमुख पाहुणो कोण असतील, उद्घाटनाचा सिनेमा कोणता असेल वगैरे सारा तपशील येत्या 1 रोजी दिल्लीत होणा:या पत्रकार परिषदेवेळी जाहीर होणार आहे. इफ्फीसाठी सगळी तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. यावेळच्या इफ्फीत अनेक बदल दिसून येतील. रेड कार्पेटजवळच प्रेस रुम असेल, असे अभ्यंकर यांनी सांगितले.