पुतळे नाचविण्यापेक्षा युवकांना रोजगार द्या, कोळसा प्रदूषण रोखा : काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 02:18 PM2018-01-18T14:18:47+5:302018-01-18T14:20:26+5:30

पुतळ्य़ांचा वाद नाचविण्यापेक्षा युवकांना रोजगार संधी द्या. कॅसिनो व कोळसा प्रदूषणापासून गोव्याची सुटका करा

Provide youth employment to idols rather than statues, prevent pollution of coal: Congress | पुतळे नाचविण्यापेक्षा युवकांना रोजगार द्या, कोळसा प्रदूषण रोखा : काँग्रेस

पुतळे नाचविण्यापेक्षा युवकांना रोजगार द्या, कोळसा प्रदूषण रोखा : काँग्रेस

Next

पणजी : पुतळ्यांचा वाद नाचविण्यापेक्षा युवकांना रोजगार संधी द्या. कॅसिनो व कोळसा प्रदूषणापासून गोव्याची सुटका करा, अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव गिरीश चोडणकर यांनी गुरुवारी येथे केली. गोवा फॉरवर्ड पक्षाला जर सत्ताच सोडायची असेल तर पुतळ्य़ांऐवजी कोळसा प्रदूषण, नद्यांचे राष्ट्रीयीकरण, म्हादई पाणी तंटा अशा विषयांवरून ती सोडावी, केवळ नाटके करून दाखवू नयेत असाही सल्ला चोडणकर यांनी दिला.

सिद्धनाथ बुयांव यांच्यासोबत चोडणकर यांनी काँग्रेस हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेतली. गोमंतकीय युवक आणि गोव्यातील लोक सरकारकडे चांगले भविष्य मागत आहेत पण सरकार मात्र त्यांच्यावर इतिहास लादू पाहत आहे. स्व. ज्ॉक सिक्वेरा यांच्या पुतळ्य़ाबाबत व अस्मिता दिन आणि जनमत कौलाबाबत मुख्यमंत्री र्पीकर, मंत्री विजय सरदेसाई व मंत्री सुदिन ढवळीकर यांनी मिळून नाटक लिहिले व हे तिन्ही नेते या नाटकातील स्वत:ची भूमिका पार पाडत आहेत. र्पीकर यांनी जनमत कौलाला पन्नास वर्षे होत असल्याने सरकार वर्षभर अस्मिता वर्षाचे कार्यक्रम साजरे करील असे जाहीर केले होते. प्रत्यक्षात मडगावमध्ये केवळ एका मतदारसंघापुरता दोन तासांचा एकच कार्यक्रम परवा वर्षभरात केला गेला. अस्मिता वर्ष साजरे करण्याबाबतची फाईल गेले दहा महिने मुख्यमंत्री र्पीकर यांच्या केबिनमध्ये पडून राहीली, असे चोडणकर म्हणाले. प्रादेशिक आराखडा, ग्रेटर पणजी अशा विषयांबाबतच्या फाईल्स मंत्री सरदेसाई हे लवकर मंजुर करून आणतात पण अस्मिता वर्षाबाबतची फाईल ते मुख्यमंत्र्यांच्या केबिनमधून गेले दहा महिने मंजुर करून आणू शकले नाही, अशी टीका चोडणकर यांनी केली.

लोकांनी गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपच्याविरोधात कौल दिला. मात्र त्या कौलाची पर्वा न करता सरदेसाई यांचा गोवा फॉरवर्ड पक्ष भाजपसोबत सत्तेत गेला. लोकांच्या मताचा आदरच केला नाही. र्पीकर, विजय सरदेसाई वगैरे मंडळी जर खरोखर गोवा ओपिनियन पोलच्या काळात सत्तेत असती व त्यावेळी लोकांनी महाराष्ट्राविरुद्ध कौल दिला असता तर त्यावेळीच जनमताविरुद्ध जाऊन त्यांनी गोवा महाराष्ट्रात विलीन केला असता. या उलट जनमत कौल हरून देखील स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी लोकांच्या मताचा आदर करून गोव्याला स्वतंत्र ठेवले. बांदोडकरांकडे बहुमत होते पण त्यांनी लोकांनी दिलेला कौल स्वीकारला. बांदोडकरांकडून र्पीकर, सरदेसाई वगैरेंनी हे थोडे तरी गुण घ्यावेत असे चोडणकर म्हणाले. गोमंतकीयांचा गमावलेला विश्वास परत मिळतो का हे तपासून पाहण्यासाठी पुतळे व जनमत कौलाचे घोडे आता नाचविले जात आहेत. मात्र गोमंतकीय यावेळी फसणार नाहीत. ज्यांच्याकडे गोंयकारपण असते, त्यांनी ते पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज पडत नाही. कोळसा प्रदूषण, नद्यांचे राष्ट्रीयीकरण, म्हादई पाणी तंटा, कॅसिनो अशा सर्व विषयांबाबत सरदेसाई व त्यांच्या गोवा फॉरवर्ड पक्षाने भाजपला साथ दिली. भाजपला तर जनमत कौल साजरा करण्याचा नैतिक अधिकारच राहिलेला नाही. कारण जनसंघ व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यावेळी गोव्याच्या विलीनीकरणाच्याबाजूने होता. त्यांना एकीकरण हवे होते. भाजपने याबाबत अगोदर गोमंतकीयांची माफी मागावी असे चोडणकर म्हणाले.

Web Title: Provide youth employment to idols rather than statues, prevent pollution of coal: Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.