गोव्यात उद्या टुरिस्ट टॅक्सींचा बंद; रेल्वे स्थानके, विमानतळावरुन कदंबची बससेवा  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 08:36 PM2018-01-18T20:36:36+5:302018-01-18T22:06:29+5:30

गोव्यात स्पीड गव्हर्नर आणि डिजिटल मिटरला विरोध करीत टुरिस्ट टॅक्सीमालकांनी आज शुक्रवारी बंद पुकारला असून हा बंद मोडून काढण्यासाठी सरकारने अत्यावश्यक सेवा कायदा (एस्मा) लागू केला आहे.

Turquoise taxis are closed in Goa tomorrow; Kadambachi bus service from railway stations, airport | गोव्यात उद्या टुरिस्ट टॅक्सींचा बंद; रेल्वे स्थानके, विमानतळावरुन कदंबची बससेवा  

गोव्यात उद्या टुरिस्ट टॅक्सींचा बंद; रेल्वे स्थानके, विमानतळावरुन कदंबची बससेवा  

Next

पणजी : गोव्यात स्पीड गव्हर्नर आणि डिजिटल मिटरला विरोध करीत टुरिस्ट टॅक्सीमालकांनी आज शुक्रवारी बंद पुकारला असून हा बंद मोडून काढण्यासाठी सरकारने अत्यावश्यक सेवा कायदा (एस्मा) लागू केला आहे. राज्यभरात सुमारे २0 हजार टुरिस्ट टॅक्सी असल्याचे सांगण्यात येते. या सर्व टॅक्सी बंद राहिल्यास पर्यटकांची मोठी परवड होणार आहे. पर्यटकांना वेठीस धरण्याच्या या प्रकाराची गंभीर दखल घेत भविष्यात ‘उबर’, ‘ओला’सारख्या टॅक्सी सेवा सुरु कराव्या लागतील, असा इशारा सरकारने दिला  आहे. पर्यटकांची गैरसोय होऊ नये याकरिता कदंब महामंडळ तसेच जीटीडीसीने बसगाड्यांची सज्जता ठेवली आहे. दुसरीकडे काळ्या-पिवळ्या टॅक्सींनी संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेऊन या बंदला दणका दिला आहे. 

पत्रकार परिषदेत बोलताना कदंब महामंडळाचे अध्यक्ष आमदार कार्लुस आल्मेदा यांनी कदंबच्या ३६ बसगाड्या सज्ज ठेवल्या असल्याचे सांगितले. मुंबई, पुणे, बंगळुरु येथून सकाळी गोव्यात पोचणाºया १७ आंतरराज्य बसगाड्याही स्थानिक मार्गांवर सेवेत आणल्या जातील. पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार निलेश काब्राल यांनी जीटीडीसीच्या १0 बसगाड्या सेवेत आणल्या जातील, अशी माहिती दिली. दाबोळी विमानतळ तसेच करमळी, थिवी, मडगांव, वास्को आदी रेल्वे स्थानकांवर कोकण कन्या, जनशताब्दी, डबल डेकर, मांडवी एक्सप्रेस, मंगला एक्सप्रेस, नेत्रावती एक्सप्रेस आदी रेलगाड्या पोचण्याच्या वेळेतही बसगाड्यांची सोय करण्यात आली आहे. 

या बसगाड्यांना विशेष तिकिट असणार आहे. विमानतळ ते पणजी तसेच विमानतळ ते मडगांव प्रत्येकी १00 रुपये, विमानतळ ते कळंगुट, विमानतळ ते फोंडा प्रत्येकी १५0 रुपये, विमानतळ ते म्हापसा १२५ रुपये तिकिट आकारले जाईल. सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत बस सेवा असेल. ‘दाबोळी’वर दिवसाकाठी सरासरी ८0 विमाने उतरतात. 

दोन कं ट्रोल रुम

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात 0८३२-२७९४१00 या क्रमांकावर तर उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात 0८३२-२२२५२८३ या क्रमांकावर संपर्क साधून पर्यटकांनी त्यांची अडचण सांगितल्यास पर्यटन खात्याचे अधिकारी आवश्यक ते साहाय्य करतील. याशिवाय जीटीडीसीच्या रेसिडेन्सींमध्ये माहिती केंद्रे उघडण्यात आलेली आहेत. 

काब्राल म्हणाले की, टुरिस्ट टॅक्सीवाले पर्यटकांकडून बेसुमार पैसे आकारले जातात याचे काही पुरावे माझ्याकडे आहेत. त्यामुळे डिजिटल मिटर प्रत्येकाने बसवायलाच हवेत. स्पीड गव्हर्नरची सक्ती कोर्टाने केलेली आहे त्यामुळे त्याची अंमलबजावणी करायलाच हवी. बेसुमार भाडे आकरणी किंवा वरचेवर बंद पुकारु न पर्यटकांना वेठीस धरले जात असल्याने गोव्याचे नाव बदनाम होत आहे. हे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत. आजपावेतो आम्ही संयम पाळला परंतु यापुढे कोणाचीही तमा न बाळगता ‘उबर’, ‘ओला’सारख्या टॅक्सीसेवा गोव्यात आणल्या जातील. ते पुढे म्हणाले की, टॅक्सीवाल्यांच्या हिताच्या अनेक गोष्टी सरकारने केलेल्या आहेत त्यामुळे त्यांनी संपावर जाऊ नये, अशी विनंतीही त्यांनी केली. काळ्या-पिवळ्या टॅक्सी संपात सहभागी होणार नसल्याने त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. पत्रकार परिषदेस वाहतूक संचालक निखिल देसाई, कदंब महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डेरिक नेटो हेही उपस्थित होते. 

Web Title: Turquoise taxis are closed in Goa tomorrow; Kadambachi bus service from railway stations, airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा