जिल्ह्यातील २४० शाळांचे होणार सक्षमीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 10:53 PM2017-10-30T22:53:06+5:302017-10-30T22:53:34+5:30

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाºया शाळा निर्माण करणे व शाळा सिद्धीत गुणांकन वाढविणे ....

240 schools in the district will be empowering | जिल्ह्यातील २४० शाळांचे होणार सक्षमीकरण

जिल्ह्यातील २४० शाळांचे होणार सक्षमीकरण

Next
ठळक मुद्देप्रत्येक तालुक्यातील ३० शाळांचा समावेश : गुणवत्तापूर्ण शाळा तयार करण्याचे ध्येय

नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाºया शाळा निर्माण करणे व शाळा सिद्धीत गुणांकन वाढविणे हे उद्देश समोर ठेवून जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेकडून १ नोव्हेंबर ते ३१ जानेवारी या तीन महिन्यात जिल्ह्यातील विशेष सहाय्याची गरज असलेल्या २४० शाळांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील आठही तालुक्यातून प्रत्येकी ३० शाळांचा समावेश करण्यात आला आहे.
महाराष्टÑ शासनाने मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ कार्यक्रम २०१५ पासून सुरू केला. त्यामुळे जिल्ह्यातील ७०९ शाळा प्रगत झाल्या आहेत. शाळा डिजीटल झाल्या व विद्यार्थ्यांना ज्ञानरचनावाद व कृतीयुक्त शिक्षण दिले जात आहे. शाळांमध्ये आयएसओ होण्यासाठी स्पर्धा वाढत आहे. आरटीई कायद्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क मिळाला. आता विद्यार्थ्यांसाठी फक्त शाळाच नको तर त्या शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे पालकांना अपेक्षीत आहे.
प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ या उपक्रमामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढत आहे. सर्वच शाळांत डिजीटल साधनांचा वापर करून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी उपाययोजना करण्यात आली. तरीही मागासलेल्या शाळांचे सक्षमीकरण करण्यासाठी आता वर्ग १ ते ८ पर्यंतच्या २४० शाळांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील ३० शाळा अशा आठ तालुक्यातील २४० शाळांचे सक्षमीकरण केले जाणार आहे.
यासाठी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायीक विकास संस्थेचे प्राचार्य राजकुमार हिवारे यांनी आराखडा तयार केला असून या उपक्रमाची अमंलबजावणी करण्यासाठी सर्व गटशिक्षणाधिकाºयांची बैठक घेण्यात आली आहे. विशेष सहाय्याची गरज असलेल्या शाळांची १०० टक्के गुणवत्ता विकसीत केली जाणार आहे.
प्रत्येक शाळेत डीएडचे ४० विद्यार्थी
गोंदिया जिल्ह्यातील २४० शाळांचे सक्षमीकरण करण्यासाठी तालुक्यातील बीआरसी स्तरावर कार्यरत विषयसाधन व्यक्ती व समावेशित विषयतज्ज्ञ यांच्यामार्फत नियोजनबद्ध कार्य करण्यात येत आहे. त्यांच्या मदतीला डीएडचे विद्यार्थी समाजसेवा शिबिरांतर्गत त्या शाळांत स्वच्छतेपासून सर्वच बाबींसाठी मदत करणार आहेत. प्रत्येक शाळेत डीएडचे ४० विद्यार्थी जाणार आहेत. विषयसाधन व्यक्ती व विषयतज्ज्ञ विद्यार्थ्यांचा स्तर निश्चीत करतील, विद्यार्थ्यांना कृतीयुक्त मार्गदर्शन व शिक्षकांना प्रात्यक्षिक देणे, शिक्षकांच्या अडचणी शोधून त्या दूर करणे, शिक्षकांना कार्यप्रवण करणे, भाषा, गणित व इंग्रजी विषयाचे शंभर टक्के कौशल्य मिळविणे, समाज सहभागासाठी व्यवस्थापन समितीची सभा, ग्रामपंचायत भेटी व ग्रामस्थांच्या भेटी घेणे, शाळांची प्रतवारी उंचावणे, शाळा प्रगतीचे अहवाल सादर करणे व शिक्षक परिषदांचे आयोजन करून चांगले कार्य करणाºया शिक्षकांना व्यासपीठ देण्याचेही काम केले जाणार आहे.
विद्यार्थ्यांचे हे गुण विकसित करणार
या उपक्रमात निवड करण्यात आलेल्या शाळांमधील १०० टक्के विद्यार्थ्यांची मराठी वाचन क्षमता विकसित करणे, गणित संबोध विकसित करणे, इंग्रजी वाचन क्षमता विकसित करणे, विद्यार्थी व शिक्षकांची स्पोकन इंग्लिश क्षमता विकसित करणे, विद्यार्थी व शिक्षकांचे विज्ञान संबोध विकसित करणे, शाळेतील सर्व विषयांत तंत्रज्ञानाचा कौशल्यपूर्ण वापर करणे, विद्यार्थ्यांना अभिव्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून देणे, अध्ययन अध्यापनात कृतीयुक्त पद्धतीने सामानीकरण रूजविणे, सामाजिक शास्त्राची स्पर्धा परीक्षेशी सांगड घालणे, शाळेतील संलग्न अंगणवाडी सेविकांचे अध्ययन अध्यापनात प्रगल्भीकरण करणे, शाळेत लोकसहभागातून भौतिक सुविधा मिळविणे, ज्ञानरचनावाद व आनंददायी पद्धतीने शिकविण्यास शैक्षणिक वातावरण निर्मिती केली जाणार आहे.

या उपक्रमामुळे ९० टक्के विद्यार्थी वाचायला लागतील. गणीत संबोधाची समस्या सुटेल. गोंदिया तालुक्यात यापूर्वी टेमणी व नागरा (मुले) या दोन शाळांत २४ दिवस इंग्लिश स्पोकनचा प्रयोग करण्यात आला. या प्रयोगामुळे वर्ग १ ते ४ चे विद्यार्थी तुटक-फुटक इंग्रजी बोलू लागले. त्या विद्यार्थ्यांचा सभाधीटपणा वाढला.
-राजकुमार हिवारे
प्राचार्य,
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायीक विकास संस्था, गोंदिया.

Web Title: 240 schools in the district will be empowering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.