कर्मचाºयांच्या संपामुळे ३२ लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 11:42 PM2017-10-21T23:42:04+5:302017-10-21T23:42:16+5:30
राज्यभरातील महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाºयांनी त्यांच्या मागण्यांना घेवून मागील चार दिवसांपासून संप पुकारला होता. या चार दिवसांच्या संपामुळे गोंदिया एसटी आगाराचे ३२ लाख रुपयांचे नुकसान झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्यभरातील महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाºयांनी त्यांच्या मागण्यांना घेवून मागील चार दिवसांपासून संप पुकारला होता. या चार दिवसांच्या संपामुळे गोंदिया एसटी आगाराचे ३२ लाख रुपयांचे नुकसान झाले. ऐन दिवाळीत एसटी कर्मचाºयांच्या संपामुळे काळी पिवळी वाहन चालकांची आणि खासगी वाहतुकदारांची मात्र चांगलीच चांदी झाली.
एसटी महामंडळाच्या गोंदिया आगारातंर्गत एकूण ९० बसेस तर तिरोडा आगारात ४४ बसेस आहेत. यापैकी काही बसेस लांब पल्याच्या तर काही बसेस जिल्हा मार्गावर धावतात. या सर्व बसेसच्या दररोज ३०० ते ४०० फेºया होतात. यातून एकट्या गोंदिया आगाराला दररोज ८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. तर तिरोडा आगाराला ४४ बसेसच्या माध्यमातून दररोज ३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. दिवाळीत या उत्पन्नात वाढ होत असते. शिवाय वर्षभराचा तोटा दिवाळीतील उत्पन्नातून भरुन काढण्यास आगाराला मदत होत असल्याची माहिती आहे. मात्र एसटी कर्मचाºयांनी ऐन दिवाळीच्या कालावधीतच चार दिवसांचा संप केला. त्यामुळे महामंडळाची बससेवा पूर्णपणे ठप्प होती. दिवाळीच्या कालावधीत बाहेरगावी ये-जा करणाºया प्रवाशांची संख्या अधिक असते. ग्रामीण भागातील नागरिक एसटीचा प्रवास अधिक सुरक्षित समजतात.
त्यामुळे या कालावधीत महामंडळाला देखील चांगले उत्पन्न मिळते. त्यामुळे दिवाळीच्या कालावधीत अतिरिक्त बसेस सुरू केल्या जातात. मात्र यंदा एसटी कर्मचाºयांनी दिवाळीच्या तोंडावर बेमुदत संप पुकारला. त्यामुळे एकट्या गोंदिया आगाराचे चार दिवसात ३२ लाख रुपयांचे नुकसान झाले. तर तिरोडा आगाराला सुध्दा १२ लाख रुपयांचा फटका बसल्याची माहिती आहे.
चार दिवसांनंतर एसटी रस्त्यावर
तब्बल चार दिवसानंतर एसटी बसेस शनिवारी(दि.२१) पासून रस्त्यावर पूर्ववत धावल्या.त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना थोडा दिलासा मिळाला. तसेच खासगी वाहतुकदारांची गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेली मनमानी देखील कमी झाल्याचे चित्र होते.
खासगी वाहतुकदारांचा फायदा
एसटी कर्मचाºयांनी ऐन दिवाळीच्या कालावधी संप केल्याने खासगी वाहतुक -दारांची चांगलीच चांदी झाली. ट्रॅव्हल्स आणि काळी-पिवळी चालकांनी प्रवाशांची गर्दी लक्षात घेत मनमर्जीनुसार प्रवास भाड्यात वाढ केली. त्याचा आर्थिक फटका प्रवाशांना सहन करावा लागला.