अपघात नसून घातपात असल्याचा आरोप
By admin | Published: September 3, 2015 01:33 AM2015-09-03T01:33:16+5:302015-09-03T01:33:16+5:30
दाभना ते सुकडी फाटा मार्गावर असलेल्या रेल्वेच्या भूमिगत बोगद्यात कुंभीटोला येथील लक्ष्मण बिसन भंडारी या इसमाचे प्रेत पाण्यात तरंगताना आढळून आले.
अर्जुनी-मोरगाव : दाभना ते सुकडी फाटा मार्गावर असलेल्या रेल्वेच्या भूमिगत बोगद्यात कुंभीटोला येथील लक्ष्मण बिसन भंडारी या इसमाचे प्रेत पाण्यात तरंगताना आढळून आले. हा अपघात नसून त्याची हत्या झाली असावी असा आरोप मृतकाच्या कुटुंबीयांनी केला आहे.
रेल्वे प्रशासनातर्फे दाभना ते सुकडी फाटा दरम्यानच्या रस्त्यावर भूमिगत बोगदा तयार करण्यात आला. या बोगद्यातील पाण्यात २७ आॅगस्ट रोजी प्रेत तरंगतांना आढळून आले. मृतकाच्या कुटुंबीयांशी त्यांच्याच घराण्यातील काही इसमांशी जमिनीचा वाद आहे. या ववादातून कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तंटामुक्त समिती व पोलीस स्टेशनला यासंदर्भात तक्रार नोंदविण्यात आली होती. या तक्रारीवर २५ आॅगस्ट रोजी दोन्ही पक्षांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले.
या प्रकरणाचा निपटारा झाल्यानंतर मृतक घरी परतलाच नाही. २७ आॅगस्ट रोजी त्याचे प्रेत बोगद्यात आढळून आले. दुसरे दिवशी प्रेत बघीतल्यानंतर ते लक्ष्मणचे असल्याचे निदर्शनास आले. पे्रताची शहानिशा केल्यानंतर ग्रामीण रुग्णालयातून ताब्यात घेऊन त्यावर कुटुंबियांनी अंत्यविधी केला. त्यानंतर संशयितांविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता शवचिकित्सा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तक्रार द्या असे पोलिसांनी सांगितले. प्रेताची पाहणी केल्यानंतर शवचिकित्सा केल्याचे दिसून आले नाही. असा आरोप करण्यात आला. पाण्यात तरंगत असलेल्या पे्रतावरुन हा अपघात नसून हत्या असल्याच्या संशयास्पद बाबी असल्याचा आरोप पत्रपरिषदेत करण्यात आला.